Chanakya Niti For Money : ‘या’ चुका केल्यास कंगाल व्हाल; लक्ष्मीमाता होईल नाराज

टाइम्स मराठी । आचार्य चाणक्य यांची चाणक्यनीति (Chanakya Niti For Money) ही सर्वांना योग्य ते मार्गदर्शन करत असते. ज्येष्ठ व्यक्तींपासून लहानांपर्यंत सर्वजण चाणक्य नीति चे आचरण करतात. चाणक्य नीति मध्ये जीवनात येणाऱ्या अपयशांना कशा पद्धतीने सामोरे जायचे, संकटांचा कशा पद्धतीने सामना करायचा यावर भाष्य केले आहे. चाणक्य यांनी दैनंदिन जीवनामध्ये घडणाऱ्या बऱ्याच गोष्टींवर लिखाण करत जीवन कशा पद्धतीने जगावे हे सांगितले आहे. यासोबतच पैसा, संपत्ती याबाबत देखील महत्वपूर्ण बाबी त्यांनी सांगितल्या. आचार्य चाणक्य सांगतात की, बरेच व्यक्ती कळत नकळत काही चुका करतात. या चुकांमुळे माता लक्ष्मी नाराज होते आणि अशा व्यक्तींच्या घरात जाणे टाळते. त्यामुळे अशा लोकांना गरिबीचा सामना करावा लागतो.

   

आचार्य चाणक्य (Chanakya Niti For Money) यांच्या मते, काही व्यक्ती कितीही मेहनत करत असले तरी देखील त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारत नाही. कारण काही चुकांमुळे माता लक्ष्मी चा हात त्यांच्यावर राहत नाही. असे व्यक्ती सतत गरीबच राहतात. त्यामुळे चुकूनही यात अशा चुका करू नये ज्यामुळे माता लक्ष्मी नाराज होईल. आजच्या चाणक्य नीति मध्ये आपण या चुका कोणत्या आहेत हे पाहणार आहोत.

१) अनावश्यक खर्च करू नये

ज्या घरांमध्ये विनाकारण पैसे खर्च केले जातात. स्वतःला अति श्रीमंत दाखवले जाते त्या घरामध्ये कधीच पैसे टिकत नाही.  अशा घरातील व्यक्ती कितीही पैसे कमवत असले कितीही मेहनत घेत असले तरी देखील त्यांना कर्ज भरावे लागते. आचार्य चाणक्य यांच्या मते, व्यक्तीला पैसे कमावण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. प्रत्येक व्यक्तीने मेहनत घेणे अत्यंत गरजेचे आहे. परंतु ज्या पद्धतीने पैसे कमावले जातात.  त्याच पद्धतीने  पैसा आल्यावर अनावश्यक खर्च देखील बरेच जण करतात. यामुळे माता लक्ष्मी नाराज होते. आणि म्हणून कधीही अनावश्यक गोष्टींसाठी पैसे खर्च करू नये. असे व्यक्ती स्वतः कंगाल होतात.

२) किचन मध्ये उष्टे भांडे ठेवू नये

आचार्य चाणक्य यांच्या मते, घरामध्ये किचन चे महत्व मोठ्या प्रमाणात आहे. आपण हॉल किंवा बेडरूम सतत स्वच्छ ठेवतो. परंतु  घरासोबतच किचनची साफसफाई करणे देखील अत्यंत गरजेचे असते. काही वेळा आपण रात्रीच्या जेवणाचे भांडे घासण्याचा कंटाळा करतो. त्यामुळे रात्री जेवण झाल्यानंतर उष्टे भांडे तसेच पडून राहतात. त्यामुळे माता लक्ष्मी नाराज होते. यासोबतच घरामध्ये दरिद्री येते.

३) संध्याकाळी घर झाडू नये- Chanakya Niti For Money

आचार्य चाणक्य यांच्या मते, घराची साफसफाई किंवा घराला सूर्यास्तानंतर झाडू पोछा मारणे चुकीचे आहे. संध्याकाळी कधीच घराला झाडू पोछा मारू नका.  कारण माता लक्ष्मी संध्याकाळच्या वेळेला घरात येते. दरवाजामध्ये घाण बघितल्यानंतर लक्ष्मी परत जाते. काही जण संध्याकाळच्या वेळेला घर साफ करतात. हे अत्यंत चुकीचे असून संध्याकाळ पूर्वी घर साफ केल्यास माता लक्ष्मी घरात येण्याच्या वेळेला घर साफ दिसेल. आणि माता लक्ष्मीचा घरामध्ये वास राहील.

४) कोणाचाही अपमान करू नये

आचार्य चाणक्य यांच्या मते, मनुष्याची वागणूक, व्यवहारावरून त्याचा स्वभाव समजतो.  त्याचबरोबर जो मनुष्य वृद्ध, विद्वान, गरीब, आणि महिलांचा अपमान करतो, त्यांच्या घरात कधीच माता लक्ष्मी येत नाही. काही व्यक्ती स्वतःला मोठे समजून दुसऱ्यांचा अपमान करत असतात. त्याचबरोबर गरिबाला असे व्यक्ती कधीच मदत करत नाही.  जर दुसऱ्यांसोबत चुकीचा व्यवहार केला तर माता लक्ष्मी त्यांच्यावर नाराज होते. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीसोबत आदराने वागा.