Chanakya Niti For Money : सावध रहा!! अन्यथा या 5 गोष्टी तुम्हाला करु शकतात कंगाल

टाइम्स मराठी । आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीतिच्या माध्यमातून आपण जीवन कसे जगावे, जीवनात येणाऱ्या संकटांचा सामना कशा पद्धतीने करावा यासाठी काही नीती सांगितल्या आहेत. या नीतीचे प्रत्येक व्यक्तीने पालन केल्यास जीवनामध्ये येणाऱ्या अडचणीवर मात करून व्यक्ती पुढे चालेल. चाणक्य नीतिनुसार (Chanakya Niti For Money) जो व्यक्ती वायफळ खर्च करत नाही  त्या व्यक्तीला कधीच पैशांची अडचण भासत नाही. त्यानुसार आचार्य चाणक्य सांगतात की, जीवनामध्ये पैशांचे मॅनेजमेंट असणे अत्यंत गरजेचे आहे.  त्यासोबतच जीवनामध्ये आर्थिक दृष्ट्या परफेक्ट बनायचे असेल तर काही नीतींचे पालन करणे गरजेचे आहे. चला आपण आज पाहणार आहोत या काही चाणक्यांनी नेमकं काय सांगितलं आहे .

   

1) ओव्हर शेयरिंग करू नये

आचार्य चाणक्य यांच्यानुसार (Chanakya Niti For Money) कधीच ओव्हर शेयरिंग करू नये. बऱ्याचदा मित्रांनो पैसे हवे असल्यास आपण कोणताही विचार न करता पैसे देतो. परंतु ते पैसे रिटर्न मागण्याची वेळ येते तेव्हा पैसे परत करण्याचा विचार कोणी करत नाही. त्यामुळे तुम्ही खर्च केलेला, शेअर केलेला पैसा आपल्या हातातून जातो.  व्यक्तीने इतरांना मदत करण्यापूर्वी आपली पैशांची गरज ओळखणे गरजेचे आहे. यासोबतच जास्त लोकांना पैसे शेअर केल्यास तुम्ही कंगाल बनू शकतात.

2) स्वतःवर कंट्रोल ठेवा– Chanakya Niti For Money

आचार्य चाणक्य सांगतात  दुसऱ्यांची वाहवा करणे किंवा त्यांच्यासमोर झुकणे हे सेल्फ डिस्ट्रक्टिव्ह असू शकते. त्यामुळे तुमच्या स्वतःचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे कधीही स्वतःवर कंट्रोल ठेवणे गरजेचे आहे. हा कंट्रोल फक्त स्वतःवरच नाही तर पैसा वर देखील ठेवणे गरजेचे आहे.  जेणेकरून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये योग्य नियोजन करू शकाल. आणि तुम्हाला इतरांसमोर झुकण्याची गरज भासणार नाही.

3) धोकेबाज व्यक्तींपासून लांब राहा

जे व्यक्ती धोकेबाज असतात त्यांच्यापासून लांब राहिलेलेच बरे. अशा व्यक्तींचा खिसा कधीही रिकामाच असतो. असे व्यक्ती पैसे कमवत असले तरी देखील कोणत्या न कोणत्या कारणाने ते खर्च करतात. त्यामुळे त्यांच्या हातात पैसा टिकत नाही आणि इतरांकडून ते पैसे जमा करतात.  परंतु हे पैसे फेडण्यासाठी ते तयार होत नाही. त्यामुळे ते पैशांसाठी धोका निर्माण करतात.

4) स्वतःचे सिक्रेट शेअर करू नये

आचार्य चाणक्य यांच्या मते  कधीच आपले सिक्रेट कोणासोबत शेअर करू नका. यामुळे देखील तुमचे नुकसान होऊ शकते. आपल्या स्वतःचे सिक्रेट फक्त मित्रांमध्येच नाही तर घरातील सदस्यांमध्ये देखील कधीच शेअर करणे हानिकारक होऊ शकते. रामायणामध्ये विभीषण ने रावणाला मारण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका निभावली होती. रामायणामध्ये जेव्हा भगवान श्री राम रावणाला हरवत आणि मारत होते तेव्हा रावण पुनर्जीवित होत होता.  परंतु जेव्हा बीभीषणाने रावणाच्या नाभीमध्ये असलेले एक अमरत्व रहस्य श्री रामाला सांगत रावणाच्या नाभीला निशाणा ठेवत बाण मारण्याचा सल्ला दिला तेव्हा रावणाचा मृत्यू झाला. या कथेनुसार कधीच आपले सिक्रेट कोणाकडे व्यक्त करू नये. सीक्रेट शेअर केल्यामुळे तुम्ही स्वतः अडचणीत येऊ शकता.

5) पैसे उधार देताना विचार करून द्या

आचार्य चाणक्य सांगतात की, (Chanakya Niti For Money) एखाद्या मित्राला किंवा नातेवाईकांमध्ये कोणाला पैशांची गरज असेल आणि तुम्हाला कोणी उसने पैसे मागत असेल तर  कधीही विचार करूनच उधार पैसे द्या. त्याचबरोबर पैसे देताना समोरचा व्यक्ती पैसे परत देईल हा उद्देश समोर ठेवून कधीच पैसे देऊ नये.  कारण व्यक्ती ज्या प्रकारे उसने पैसे घेऊन जातो त्या प्रकारे पैसे परत देण्याची इच्छा होत नाही. आणि तो व्यक्ती उसने घेतलेले पैसे देतही नाही. मानवामध्ये घेण्याची वृद्धीवृत्ती जास्त आहे परंतु परत देण्याची नाही. त्यामुळे कधीही विचार करूनच समोरच्याला पैसे उधार द्या.