टाइम्स मराठी । चाणक्यनीतिच्या माध्यमातून आपण यशस्वी होण्यासाठीचे (Chanakya Niti For Success) काही उपाय आणि नीती यांचा अभ्यास करत असतो. आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या काही नीती ह्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये उपयोगी पडतात. त्यानुसार आचार्य चाणक्य यांनी जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठीच्या काही नीती सांगितल्या आहेत. आचार्य चाणक्य यांनी आयुष्य जगताना बऱ्याच गोष्टींचा सामना केला. परंतु न डगमगता त्यांनी सोप्या पद्धतीने अडचणींवर मात करत त्यांचे जीवन सुखदायी बनवले. आचार्य चाणक्य यांच्या नीतीचे पालन केल्यास आपण सर्वजण सुखी आयुष्य जगू शकतो. तसेच आयुष्यात यशस्वी होऊ शकतो.
आचार्य चाणक्य यांच्या मते, व्यक्तींना यशस्वी होण्यासाठी कोणीही रोखू शकत नाही. परंतु जीवनात अशा काही गोष्टी असतात किंवा अशा काही घाण सवयी असतात ज्यामुळे कोणताच व्यक्ती यशस्वी होऊ शकत नाही. त्यामुळे यशस्वी होण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने या काही सवयींचा त्याग करणे गरजेचे आहे. जेणेकरून आयुष्यात यशस्वी होण्यासाठी कोणतेही प्रॉब्लेम्स येणार नाही. त्यानुसार आज आपण या वाईट सवयी कोणत्या आहेत ते पाहणार आहोत.
१) नशा करणे- Chanakya Niti For Success
नशा करणे हे अत्यंत वाईट सवय असून यामुळे त्या व्यक्तीचे प्रचंड नुकसान होते. एखादा व्यक्ती नशा करत असेल. किंवा त्याहीपेक्षा वाईट सवय त्या व्यक्तीला असेल तर, त्या व्यक्तीने अशा सवयी तात्काळ सोडायला पाहिजे. जो व्यक्ती सतत नशा करतो तो व्यक्ती त्यांच्या आयुष्यामध्ये कधीच यशस्वी होऊ शकत नाही. आणि यामुळे तो त्याचे काम उत्साहीपणे करू शकत नाही. आचार्य चाणक्य यांच्या मते जो व्यक्ती नशा करतो त्या व्यक्तीचा आत्मविश्वास डगमगतो. आणि नशा कर्तव्यापासून लांब घेऊन जात असतो.
२) इंद्रियांवर नियंत्रण असणे गरजेचे
आचार्य चाणक्य सांगतात की, प्रत्येक व्यक्तीने त्यांच्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवले पाहिजे. जर इंद्रियांवर नियंत्रण नसेल तर आयुष्यात असे व्यक्ती यशस्वी होऊ शकत नाही. आणि स्वतःचे काम पूर्ण करू शकत नाही. ज्या व्यक्तींचे इंद्रिय नियंत्रणात असतात, ते व्यक्ती कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वतःचे काम पूर्ण करून आयुष्यात यशस्वी (Chanakya Niti For Success) होऊ शकतात. आणि त्यांना यशस्वी होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. परंतु इंद्रियांवर नियंत्रण नसलेल्या व्यक्तींचे सर्व काही नष्ट देखील होऊ शकते.