Chanakya Niti For Success : यशस्वी होण्यासाठी चाणक्यांनी दिला ‘हा’ कानमंत्र

Chanakya Niti For Success । आचार्य चाणक्य यांची चाणक्य नीती आयुष्यात प्रत्येक वळणावर मार्गदर्शन करत असते. आचार्य चाणक्य हे कुटनीतज्ञ, राजनीति शास्त्रज्ञ, होते. त्यांनी बऱ्याच संग्रहांचे लिखाण केले असून अर्थशास्त्र नीतीशास्त्र हे संग्रह प्रसिद्ध आहे. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक गोष्टींचा सामना करत यश गाठले. त्याचप्रमाणे आलेल्या सर्व अडचणीवर आणि जीवन कशा पद्धतीने जगले पाहिजे यावर भाष्य केले आहे. आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या नियमांचे पालन केल्यास आपण जीवनात यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. आचार्य चाणक्य यांच्या मते जीवनात पुढे जाण्यासाठी काही गोष्टींचा विचार करणे आणि त्या गोष्टी आचरणात आणणे गरजेचे आहे.

   

आयुष्यात येणाऱ्या बऱ्याच अडचणींचा सामना करतच पुढे जावे लागते. या अडचणी कधी संपणार्‍या नसून त्यावर मात करून पुढे जावे लागते. आचार्य चाणक्य सांगतात की, प्रत्येक व्यक्तीने यशस्वी होण्यासाठी (Chanakya Niti For Success) या काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. जेणेकरून आयुष्यात येणाऱ्या संकटांचा सामना करत यशस्वी होता येईल.

१) मूर्ख व्यक्तींच्या नांदी लागू नये

आयुष्यामध्ये आपल्याला प्रत्येक पावलोपावली वेगवेगळ्या स्वभावाची माणसे भेटत असतात. त्यातील काही व्यक्ती चांगला सल्ला देतात तर काही व्यक्तीमूर्ख असतात. मूर्ख व्यक्ती इतरांना त्रास देतात. या व्यक्तींपासून लांब राहणे गरजेचे आहे. आचार्य चाणक्य यांच्या मते, मूर्ख व्यक्तींसोबत कधीच वादविवाद करू नका. अशा व्यक्तींपासून दूर राहणे योग्य आहे. कारण मूर्ख व्यक्तींसोबत वाद घातल्यास आपलाच वेळ वाया जातो. मूर्ख व्यक्तींना कोणत्याच गोष्टीचा फरक पडत नाही.

२) या तीन गोष्टीवर करू नका दुर्लक्ष- Chanakya Niti For Success

चाणक्य नीति नुसार, ऋण शत्रू आणि रोग  या तिन्ही गोष्टी  छोट्या नसून  यामुळे आपल्याला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे या तिन्ही गोष्टींकडे कधीच दुर्लक्ष करू नका. दुर्लक्ष केल्यास  पुढे चालून तुम्हाला वाईट परिणाम दिसू शकतात. या तिन्ही गोष्टी वेळोवेळी सोडवणे गरजेचे आहे. कारण वेळ गेल्यावर या गोष्टी कमी होण्यापेक्षा वाढतात.

३) न ऐकणाऱ्या व्यक्तीला कोणतीच गोष्ट सांगू नये

प्रत्येक व्यक्तीला आपलं कोणीतरी ऐकून घ्यायला पाहिजे असं वाटतं. त्यामुळे सतत व्यक्ती मित्रांना किंवा जवळच्या व्यक्तीला सर्व गोष्टी  शेअर करत असतात. परंतु समोरचा व्यक्ती ऐकण्याच्या मनस्थितीत आहे की नाही, किंवा त्या व्यक्तीला आपले बोलणे ऐकण्यामध्ये इंटरेस्ट आहे की नाही हे पाहणे देखील गरजेचे आहे. आचार्य चाणक्य यांच्या मते, जे व्यक्ती समोरचा व्यक्ती बोलत असताना इकडे तिकडे पाहत असेल  तर तो व्यक्ती विश्वास ठेवण्याच्या लायक नाही. आणि अशा व्यक्तींना तुम्ही सांगत असलेल्या गोष्टी ऐकण्यामध्ये देखील काहीच इंटरेस्ट नसतो. त्यामुळे जे व्यक्ती तुमचे ऐकतात त्यांनाच काही गोष्टी सांगत चला.

४) इतरांच्या चुकांमधून घ्या धडा

आयुष्यात सर्वांच्या हातातून चुका होत असतात. या चुका सुधारणे आपल्या हातात असते. त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीने इतरांच्या चुकांमधून धडा घेतला पाहिजे. जेणेकरून तुमच्या हातातून ती चूक होऊ नये. असं म्हणतात की चुकांमधूनच व्यक्ती शिकत असतो. यासोबतच इतरांच्या चुकांमधून आपण शिकणे देखील अत्यंत गरजेचे आहे. आचार्य चाणक्य यांच्यामध्ये, इतरांनी केलेल्या चुका तुम्ही करत असाल आणि त्यानंतर तुम्ही त्यातून शिकत असाल तर तुमचे यश कमी होते.

नशिबावर अवलंबून राहणे चुकीचे

आचार्य चाणक्य यांच्या मते, सतत नशिबावर अवलंबून राहणे चुकीचे आहे. नशिबापेक्षा स्वतः ने केलेले कामे मेहनत ही महत्त्वाची असते. जे व्यक्ती नशिबावर अवलंबून असतात त्यांचा नाश व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे आचार्य चाणक्य सांगतात, कधीही मेहनतीवर अवलंबून राहा. नशिबावर अवलंबून राहिल्यास तुमचा नाश होईल.

इज्जत नसलेल्या ठिकाणी जाऊ नये

प्रत्येक व्यक्तीला त्याची इज्जत महत्वाची असते. परंतु एखादा ठिकाणी आपल्याला इज्जत, ज्ञान, मित्र नसेल  त्या ठिकाणी जाणे सोडले पाहिजे. अशा ठिकाणी तुम्ही जात असाल तर तुम्हाला कधीच इज्जत मिळू शकत नाही. त्यामुळे अशा ठिकाणी कधीच जाऊ नका.