Chanakya Niti: यशाच्या संधी कशा ओळखाल? चाणक्यांचे ‘हे’ उपदेश नक्कीच तुमच्या कामी येतील

टाइम्स मराठी : चाणक्य नीति हा प्राचीन ग्रंथ असून आचार्य चाणक्य यांनी हा लिहिलेला आहे. आचार्य चाणक्य यांनी वेगवेगळे लेखन केलेले आहे. त्यापैकी खास म्हणजे नीतिशास्त्र. नीतीशास्त्रानुसार वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये यश मिळवण्यासाठी आणि यशाच्या संधी शोधणं हे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे आपण आयुष्यात यशस्वी होऊ शकतो. यश हे प्रत्येकाच्या जीवनात महत्त्वाचं आहे. त्यानुसार आचार्य चाणक्यांनी यशाच्या गुणांचे वर्णन करत माणसाने यश मिळवण्यासाठी काय करायला हवे हे सांगितले आहे. ज्यातून यशस्वी होण्यासाठीचे मार्ग आणि संधी याबाबत आपण जाणून शकतो.

   

आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या नीतीनुसार, एखादा व्यक्ती सफलतेची संधी न ओळखता यशस्वी होण्यासाठी कामाला लागतो. त्याला यश मिळत नाही. तसेच जर एखादी व्यक्ती स्वत:ला भाग्यवान समजत असेल, पण वेळ न ओळखता कामाला सुरुवात करत असेल तर अशा व्यक्तीवर लक्ष्मी प्रसन्न होत नाही. लक्ष्मी त्याला सोडून जाते.

चाणक्यनीती नुसार, माणसाचे कर्तव्य आहे की त्याने अनुभवाची शक्ती आणि विचारांची शक्ती या दोन्हींच्या साहाय्याने योग्यतेचा निर्णय घ्यायला हवा. हा निर्णय घेण्यासाठी आपल्याला काम कश्या प्रकारे करायचे आहे याची माहिती असणे गरजेचे आहे.

आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या श्लोकानुसार जो व्यक्ती ज्या कामात निपुण आहे त्याला त्याच कामात लावले पाहिजे. जो व्यक्ती ज्या कामात कुशल असेल तेच काम त्या व्यक्तीने केले पाहिजे. व्यक्तींनी त्यांची योग्यता तपासून त्यानुसार काम केल्यास ते यशस्वी होते.

आचार्य चाणक्यांच्या नीतीनुसार, साधने जाणणारा सर्वात कठीण गोष्टीही सहज साध्य करतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीला तो करत असलेल्या कामाची पद्धत माहिती असेल तर तो ते काम सहज करू शकतो. मग ते काम कितीही कठीण असले तरी त्याच्यासाठी सोपे असते. प्रत्येक कार्य पूर्णत्वाकडे नेण्यासाठी वेगवेगळे उपाय आवश्यक असतात. ज्याला या उपायांचे ज्ञान नसते तो व्यक्ती काम करण्यास असक्षम असतो.