Chanakya Niti For Success : यशस्वी होण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने सोडावी ‘ही’ सवय

Chanakya Niti For Success । आचार्य चाणक्य हयांच्याबद्दल तर तुम्ही ऐकलंच असेल. आचार्य महान विद्वान होते. त्यांनी बऱ्याच संग्रहांचे लिखाण केले आहे. . या संग्रहांपैकी चाणक्य नीति हा संग्रह मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे. चाणक्यनीती मध्ये आचार्य चाणक्य यांनी बरेच मार्गदर्शन केलं आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी काय करावं? याबाबत चाणक्य यांनी बरेच उपाय सांगितले आहे. त्यांनी सांगितलेल्या नीतीचे आचरण केल्यास प्रत्येक व्यक्ती आयुष्यात यशस्वी होऊ शकतो. आचार्य चाणक्य यांनी व्यक्तींच्या अशा सवयींबद्दल भाष्य केले आहे, ज्या सवयी सोडल्यास  व्यक्ती आयुष्यात यशस्वी होऊ शकेल. जाणून घेऊया आजची चाणक्य नीति.

   

श्रेष्ठ वस्तूंची लालच ठेवणे-

चाणक्यनीतीनुसार,(Chanakya Niti For Success) प्रत्येक व्यक्तीकडे असलेली वस्तू ही मौल्यवानच असते. त्यामुळे इतरांकडे असलेल्या वस्तूंच्या मागे पडण्यापेक्षा स्वतःकडे असलेल्या वस्तूंवर खुश होणे गरजेचे आहे. जे व्यक्ती सुविधाजनक वस्तू असून देखील दुसऱ्या श्रेष्ठ वस्तूंची लालच ठेवतात  ते व्यक्ती मूर्ख असतात. जी गोष्ट आपल्या नशिबात नसते त्या गोष्टीच्या मागे लागून काहीच फायदा होत नाही. आचार्य चाणक्य सांगतात की, जास्त चांगल्या गोष्टींच्या  मागे लागल्यास  किंवा चांगल्यात चांगली गोष्ट शोधत राहिल्यास ती गोष्ट हाती लागत नाही परंतु नंतर पश्चाताप करावा लागतो. स्वतःकडे असलेल्या वस्तूंकडे जे व्यक्ती लक्ष देत नाही  त्या व्यक्ती दुसऱ्या वस्तूच्या शोधात जातात. त्यांच्या हाती काहीच लागत नाही.

अंथरुन पाहून पाय पसरणे- Chanakya Niti For Success

आचार्य चाणक्य नुसार, प्रत्येक व्यक्तीने अंथरूण पाहून पाय पसरायला पाहिजे. कारण बऱ्याच व्यक्ती गरजेच्या वस्तूंकडे लक्ष न देता इतर गोष्टींकडे आकर्षित होत असतात. परंतु गरजेच्या वस्तू त्यांच्यासाठी मौल्यवान राहत नाही. अशावेळी गरजेच्या वस्तू सोबतच आकर्षित करणाऱ्या वस्तू देखील हाती येत नाही. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने जेवढे गरजेचे आहेत तेवढ्याच गोष्टीकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे. आचार्य चाणक्य यांच्या मते, पैसा, सुख सुविधा, खाण्यापिण्याच्या गोष्टी या सर्व गोष्टी जर एखाद्या व्यक्तीकडे असेल तर त्याने सर्वात पहिले याच गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. त्यानंतर तो व्यक्ती पुढे यापेक्षा अप्रतिम करण्याचा प्रयत्न करू शकतो.