Chanakya Niti For Success : आयुष्यात यशस्वी होण्यासाठी ही नाती महत्वाची; या लोकांची साथ हवीच

Chanakya Niti For Success । विष्णुपंत शिरोमणी म्हणजेच आचार्य चाणक्य हे नाव सर्वांसाठी परिचित आहे. आचार्य चाणक्य चक्रवर्ती सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांचे प्रमुख मंत्री आणि चारक संहिता लेखक होते. आचार्य चाणक्य यांनी आतापर्यंत बऱ्याच संग्रहाचे लिखाण केले आहे. या संग्रहांपैकी नीतिशास्त्र आणि अर्थशास्त्र हे संग्रह अत्यंत लोकप्रिय आहे. आचार्य चाणक्य यांच्या जीवनात आलेल्या सर्व अडचणींचा सामना करत त्यांनी त्यांचे आयुष्य जगले. या अडचणींबाबतच आचार्य चाणक्य यांनी मार्गदर्शन केले आहे. जीवनात येणाऱ्या प्रत्येक अडचणींवर कशा पद्धतीने मात करणे गरजेचे आहे हे त्यांनी सांगितलं आहे.

   

आचार्य चाणक्य हे जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटांवर मात करण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठीच्या काही नीती सांगत असतात. या नीतींचे पालन केल्यास प्रत्येक व्यक्ती त्यांच्या आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. यशस्वी होण्यासाठीच्या नीतीसोबतच आचार्य चाणक्य यांनी काही नाते संबंधांबाबत देखील भाष्य केले आहे. आचार्य चाणक्य म्हणतात की, व्यक्ती यशस्वी होत असताना नातेसंबंध त्यांना मजबुती देत असतात. आपल्या आयुष्यामध्ये असे काही नाते असतात ज्यामुळे आपण सर्व अडचणींचा सामना करू शकतो. आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी हे तीन नाती महत्वाचे असतात. या तिन्हीही नात्यांचा विश्वास आणि साथ तुमच्यासोबत असेल तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.

१) मुले –

आचार्य चाणक्य यांनी बऱ्याच सिद्धांतामध्ये मुलांवर, मुलांच्या संकरांवर भाष्य केले आहे. त्यांच्या मते प्रत्येक मुलाला शिक्षा संस्कार आणि चांगले शिक्षण देणे गरजेचे आहे. चांगल्या मुलाचे समर्थन करणे हे त्याच्या वडिलांची सर्वात मोठी ताकद आहे. जेणेकरून कोणत्याही परिस्थितीमध्ये मुलगा खचुन न जाता आयुष्यात पुढे जात राहील. मुलासोबत त्याचे वडील हे खंबीरपणे उभे असतील तर मुलगा कधीच यशस्वी (Chanakya Niti For Success) झाल्याशिवाय राहणार नाही. वडिलांची साथ आणि मुलाची साथ असल्यास कोणत्याही अडचणींचा सामना करता येतो.

२) पत्नी- Chanakya Niti For Success

हिंदू धर्मामध्ये पती-पत्नीच्या नात्याला पवित्र मानले जाते. ज्याप्रमाणे प्रत्येक पुरुषाच्या पाठीमागे महिलांचा हात असतो, त्याप्रमाणे प्रत्येक पतीच्या मागे त्यांची पत्नी उभी असेल तर कोणत्याही अडचणीचा सामना करता येऊ शकतो. ज्या व्यक्तींना प्रेमळ आणि साथ देणारी बायको मिळते, ते व्यक्ती त्यांच्या आयुष्यामध्ये कोणत्याही अडचणींवर मात करू शकतात. सुखासोबतच दुःखात देखील उभ राहणारी पत्नी ही नशीबवान व्यक्तींनाच मिळते. असे व्यक्ती कधीच अपयशी ठरू शकत नाही.

३) मित्र-

आचार्य चाणक्य हे बरेचदा मैत्री आणि संगत याबाबत भाष्य करत असतात. आयुष्यामध्ये चांगली मैत्री आणि चांगली संगत असणे अत्यंत गरजेचे असते. वाईट संगतीला लागून बरेच मुलं हे त्यांच्या आयुष्याची वाट लावतात. परंतु जो मित्र चांगल्या मार्गावर जाण्यासाठी प्रवृत्त करतो, तो खरा मित्र असतो. अशा मित्राची साथ मिळाल्यास प्रत्येक व्यक्ती हा यशस्वी होईल. (Chanakya Niti For Success) आचार्य चाणक्य सांगतात की, दुष्ट व्यक्तींसोबत मैत्री करण्यापेक्षा तुम्हाला सतत साथ देणाऱ्या आणि तुमचे भलं लेखणाऱ्या व्यक्तींसोबत मैत्री करा.