Chanakya Niti : अशाप्रकारे मिळवा शत्रूवर विजय; पहा काय सांगते चाणक्यनीती?

टाइम्स मराठी । आचार्य चाणक्य (Chanakya Niti) म्हणजे विष्णुगुप्त शिरोमणी. ते प्राचीन भारतीय राजनीति शास्त्रज्ञ असून चाणक्य म्हणून त्यांची सर्वत्र ओळख आहे. आचार्य चाणक्य यांनी जीवनात बऱ्याच वाईट गोष्टींचा सामना करत आयुष्य चांगल्या प्रकारे जगले आहे. आचार्य चाणक्य यांनी बऱ्याच प्रकारचे लेखन केले असून त्यांच्या संग्रह पैकी एक म्हणजे नीतीशास्त्र. नीतीशास्त्र आपल्या सर्वांच्या ओळखीतील संग्रह आहे. चाणक्य यांच्या मते, जीवन जगत असताना मित्राप्रमाणे शत्रू देखील तयार होत असतात. अशावेळी शत्रूंना सामोरे जाण्यासाठी भांडण करण्याची गरज नसते. शत्रूवर विजय मिळवण्यासाठी आपण शांततेने विचार करणे गरजेचे असते. शत्रूवर कशा प्रकारे विजय मिळवता येईल हे चाणक्य यांनी सांगितलं आहे. चला जाणून घेऊया.

   

१) खचलेल्या अवस्थेत देखील ध्येय सोडू नका –

आचार्य चाणक्य यांच्यानुसार, आयुष्यामध्ये ध्येय निश्चित करणे अत्यंत गरजेचे आहे. परंतु निश्चित केलेले ध्येय कोणताही परिस्थितीमध्ये साध्य केले पाहिजे. आपल्या शत्रूसमोर आपण कितीही खचलेले असलो तरीही तुमचे ध्येय कधीही विसरू नका. शत्रूसमोर हार मानण्याची वेळ आल्यावर देखील कधीच आपले ध्येय विसरू नये. असं केल्यास तुम्ही न भांडता तुमची लढाई जिंकू शकतात.

२) रागाच्या भरात निर्णय घेऊ नका- Chanakya Niti

चाणक्य नीति (Chanakya Niti) नुसार प्रत्येक व्यक्तीला आपल्या रागावर नियंत्रण ठेवता आले पाहिजे. रागाच्या भरात व्यक्ती असे काही निर्णय घेतो की ज्यामुळे नुकसान त्याच व्यक्तीचे होते. त्यामुळे समोर शत्रू किंवा जवळचा व्यक्ती जरी असला तरीही थंड डोक्याने विचार केला पाहिजे.

३) शत्रूला कमी लेखू नका-

कधीही तुमच्या शत्रूला कमी लेखू नका. जर शत्रू कमजोर असेल तर तुम्ही त्याची कमतरता समजून घेऊन पुढील निर्णय घेऊ शकतात. नाहीतर तुम्ही कमजोर शत्रू कडून पराजित व्हाल. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करूनच तुम्हाला शत्रूवर विजय मिळवता येईल.