Chanakya Niti : भारतातील महान विद्वान, ज्ञानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आचार्य चाणक्य यांचा नीतीशास्त्र हा संग्रह सर्वाना परिचित आहे. आचार्य चाणक्य यांनी बरेच लिखाण केले असून त्यांच्या लेखनापैकी चाणक्यनीती हा एक संग्रह आहे. या संग्रहाच्या माध्यमातून आचार्य चाणक्य यांनी जीवनामध्ये आलेले अनुभव अडचणी यांवर कशा पद्धतीने मात केली पाहिजे हे सांगितले आहे. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने चाणक्य नीति आचरणात आणली पाहिजे. जेणेकरून आपल्याला आयुष्यात संकटांचा सामना करता येईल. आणि यशस्वीपणे आपण जीवन जगू शकू. आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या नीती या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये लाभदायक आहेत.
आचार्य चाणक्यांनी मनुष्याच्या जीवनाशी संबंधित प्रत्येक गोष्टीवर (Chanakya Niti) भाष्य केले आहे. आचार्य चाणक्य यांच्या मते बुद्धिमान, ज्ञान आणि शक्ती प्राप्त करण्यासाठी काही गोष्टी आचरणात आणणे गरजेचे असतात. त्याचबरोबर यासाठी काही सवयी नाकारणे देखील तेवढेच महत्त्वाचे असते. ज्याप्रमाणे यशस्वी होण्यासाठी काम करणे महत्त्वाचे आहे त्याचप्रमाणे पोषक आहार मिळणे देखील प्रत्येकाला गरजेचे आहे. पोषक आहार प्रत्येक व्यक्तीला मिळत असेल तर कामातही लक्ष लागते आणि ऊर्जा वाढते. त्यानुसार आपण आज पाहणार आहोत बुद्धी ज्ञान आणि शक्ती मिळवण्यासाठी काही नीती.
१) पोषक जेवण
आचार्य चाणक्य नीतीनुसार (Chanakya Niti) प्रत्येक व्यक्तीने त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी पोषक अन्न प्रत्येक व्यक्तीला मिळायला पाहिजे. त्यानुसार गव्हाची चपाती भात दूध मास या गोष्टीचे सेवन केल्यामुळे प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य सुधारू शकते आणि व्यक्ती बऱ्याच रोगांचा सामना करू शकतो. त्याचबरोबर गहूच्या पिठामध्ये दहा पट जास्त ऊर्जा असते. त्यामुळे जे व्यक्ती चपाती आणि भात खातात ते व्यक्ती दिवसभर ऊर्जा ने परिपूर्ण असतात. त्यांच्या अंगात ताकद असते.
२) दुधाचे सेवन– Chanakya Niti
आचार्य चाणक्य सांगतात, गव्हाच्या पिठापेक्षा जास्त दुधामध्ये ऊर्जा असते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आरोग्य सुधारण्यासाठी दररोज दूध घेतले पाहिजे. जेणेकरून कामात आणि अभ्यासात मन लागेल. आणि व्यक्तींचे आरोग्य देखील सुधारू शकेल. दुधामध्ये जास्त ऊर्जा असल्यामुळे लवकर थकवा येत नाही. ज्या प्रकारे वेळेवर जेवण महत्त्वाचे आहे त्याचप्रकारे दुधाचे सेवन करणे देखील अति महत्त्वाचे आहे.
३) मांस खाणे –
बरेच जण मास खाणे पसंत करतात. आचार्य चाणक्य सांगतात की प्रत्येक व्यक्तीने मास चे सेवन करायला हवे. जेणेकरून कोणतेही काम करत असताना ऊर्जा मिळेल. दुधापेक्षा जास्त ऊर्जा ही मास मध्ये असते. मास सेवन केल्यामुळे आरोग्य देखील चांगले राहते आणि व्यक्तींमध्ये ताकद येते.
४) तुपाचे सेवन
शारीरिक आरोग्य पेक्षा जास्त मानसिक शक्ती स्पष्टता संकल्प बुद्धी आणि ज्ञान वाढवण्यासाठी दररोज तुपाचे सेवन करणे गरजेचे आहे. जेणेकरून चेहऱ्यावर निखार आणि आरोग्य चांगले राहते. दररोज तुपाचे सेवन केल्यामुळे रोग प्रतिरोधक क्षमता वाढते. आणि तुपाचे सेवन करणारे व्यक्ती आजारी पडत नाही. त्यामुळे तुपाचे सेवन करणे हे योग्य मानले जाते.