Chanakya Niti : महिलांच्या अंगातील ‘या’ 4 सवयींमुळे घराचं होईल नरक

टाइम्स मराठी । आचार्य चाणक्य म्हणजे विष्णुपंत शिरोमणी यांनी बऱ्याच ग्रंथांचे लेखन केले आहे. त्याचबरोबर त्यांनी लिहिलेल्या संग्रहामधून जीवन जगताना येणाऱ्या अडचणींवर लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजण मात करू शकतात. चाणक्यनीती (Chanakya Niti) आचरणात आणल्यास आपले आयुष्य सुखदायी आणि आनंदमय होऊ शकते. आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीति मध्ये यशस्वी होण्यासाठी मूलमंत्रे, काही वाईट सवयी, दैनंदिन जीवनात गरजेच्या गोष्टी, वैवाहिक जीवन, मान अपमान, यासारख्या बऱ्याच गोष्टींवर भाष्य केले आहे. त्याचबरोबर वैवाहिक जीवनासोबत जोडल्या गेलेले काही प्रश्नांची उत्तरे देखील त्यांनी दिले आहे.

   

आचार्य चाणक्य सांगतात की, महिलांच्या या चार वाईट सवयींमुळे घरामध्ये वाद होऊ शकतो. या काही सवयींमुळे घरामध्ये सुख समृद्धी नांदत नाही. महिलांच्या काही वाईट सवयी या घराला नरक बनवल्याशिवाय राहत नाही. यासोबतच  महिलांच्या काही सवयी त्यांच्या वैवाहिक जीवनासाठी चांगल्या असल्या तरी देखील त्यांच्या वाईट सवयीमुळे नुकसान होऊ शकते. जाणून घेऊया कोणत्या आहेत या चार वाईट सवयी.

१) खोटं बोलणे– Chanakya Niti

एखाद्या व्यक्तीसोबत खोटं बोलून आपले काम करून घेणे ही वाईट सवय बऱ्याच लोकांना असते. यासोबतच महिलांना देखील ही सवय असते. बऱ्याचदा महिला त्यांच्या पतीसोबत खोटं बोलतात. तर काहीवेळा महिला पतीच्या भल्यासाठी खोटे बोलत असतात. परंतु खोटे बोलून कोणतेही काम करणे हे चुकीचे आहे. पतीच्या भल्यासाठी बोललेले खोटं हे वैवाहिक जीवनासाठी योग्य असले तरी देखील यामुळे बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागू शकते.

२) समजूतदारपणा न दाखवणे

पती-पत्नी यांच्या वैवाहिक जीवनामध्ये  चढ-उतार चालूच असतात. पती-पत्नी एकमेकांना समान समजतात. परंतु काही महिला पती पेक्षा स्वतःला समजूतदार समजतात. या महिला  सतत पती पेक्षा जास्त समजूतदार असल्याचं इतरांसमोर साध्य करत असतात. अशा महिलांना समोरील व्यक्ती आपल्यापेक्षा कमजोर आहे असे वाटते. परंतु हे चुकीचे आहे. या अशा सवयीमुळे बऱ्याचदा समोरचा व्यक्ती अडचणीमध्ये फसू शकतो. त्यामुळे प्रत्येक महिलांनी सांभाळून राहणे गरजेचे आहे. आचार्य चाणक्य यांच्या मते, समजूतदारपणा दाखवणे हे कधीच साध्य करावे लागत नाही. समजूतदारपणा हा वागण्यातून दिसत असतो.

३) पैशांची हाव

पैशांच्या बाबतीत महिला या पुरुषांपेक्षा जास्त लालची असतात. महिला या पैसे वाढवण्यासाठी सतत विचार करत असतात. काही महिला या पैसे मिळवण्यासाठी कोणत्याही वाईट मार्गाला देखील जाण्यासाठी तयार असतात. आणि  चुकीचे पाऊल उचलतात. हे अत्यंत चुकीचे असून यामुळे वैवाहिक जीवनात (Chanakya Niti) संकट येऊ शकते.

४) कोणतेही काम करताना विचार करणे गरजेचे

बऱ्याच महिला या असं काम करतात ज्यामध्ये काहीच लॉजिक नसेल. महिला या दुसऱ्यांच्या बोलण्यात येऊन कोणतेही काम करायला तयार होतात. यामुळे नंतर पश्चात्ताप देखील होतो. पण वेळ निघून गेल्यावर स्थिती पहिल्यासारखी होत नाही. त्यामुळे महिलांनी कोणतेही काम करताना विचार करून गरजेचे आहे. जेणेकरून मानसन्मान मिळेल,आणि नंतर पश्चात्ताप करावा लागणार नाही.