टाइम्स मराठी । आचार्य चाणक्य हे विश्वगुप्त शिरोमणी होते. भारतातील एक महान राजकारणी, रणनीतिकार आणि अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्यांची ओळख होती. चाणक्यांनी आपल्या चाणक्यनीतीमध्ये अनेक मार्गदर्शक तत्वे सांगितली आहेत. यामध्ये मनुष्याने यशस्वी होण्यासाठी काय करावं ? पती-पत्नी मध्ये नातं टिकवण्यासाठी कोणते प्रयत्न करावे? आयुष्यात यश कस मिळवावे? आर्थिक सुखसमृद्धीसाठी जीवनात काय बदल करावेत याबाबत सल्ले दिले आहेत. आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतीत महिलांविषयी सुद्धा परखड (Chanakya Niti For Women) भाष्य केलं आहे. चाणक्यनीती नुसार, ३ प्रकारच्या महिलांपासून सावध राहणे गरजेचं आहे अन्यथा तुम्ही मोठ्या संकटात सापडू शकता. या महिला नेमक्या कोणत्या आहेत तेच आपण जाणून घेऊयात….
1) चुगल्या करणाऱ्या महिला –
आचार्य चाणक्य यांच्यामते, , ज्या स्त्रिया इतर गप्पागोष्टी करतात किंवा कोणाबद्दल चुगल्या करतात त्या केवळ स्वतःच्या कुटुंबाचे सुख नष्ट करत नाहीत तर इतर लोकांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे सुख हिरावून घेतात. यामुळे समोरच्या माणसाच्या कुटुंबात गैरसमज निर्माण होतात आणि लोकांमध्ये मतभेदही होतात. काही स्त्रियांचा स्वभाव असा असतो कि एखादी गोष्ट त्यांना समजली कि ती त्यांच्या तोंडात राहत नाही, लगेच ते कोणाला ना कोणाला तरी सांगत सुटतात. यामुळे २ कुटुंबात वाद आणि संघर्ष सुद्धा होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा महिलांपासून नेहमी सावध राहावे.
2) रागीट स्वभावाच्या महिला– Chanakya Niti For Women
आचार्य चाणक्य यांच्या मते, रागीट स्वभावाच्या महिलांपासून (Chanakya Niti For Women) नेहमी सावध राहावं. कारण माणूस रागाच्या भरात कधी काय करेल ते आपण सांगू शकत नाही. जी महिला नेहमी रागात असते तिच्या घरात सुद्धा नेहमी भांडणे होण्याची शक्यता असते. महिलांचा राग केवळ त्यांच्यासाठीच नव्हे तर घरातील पुरुष मंडळींसाठी सुद्धा घातक असतो, त्यामुळे अशा महिलांपासून नेहमी सावध राहावे.
3) खोटे बोलणारी महिला–
चाणक्यच्या मते, ज्या महिलांना प्रत्येक मुद्द्यावर खोटे बोलण्याची सवय असते त्यांच्यापासून तुम्ही दूर राहावे. आपण आयुष्यात कधी तरी खोटं बोलतो, परंतु सतत खोटे बोलण्याची सवय चांगली नाही. कारण सत्य बाहेर आल्यावर अशा महिला अस्वस्थ होतात आणि चांगले कुटुंब उद्ध्वस्त करतात. आणि खोटं बोलणारी महिला कधीही तुम्हाला तोंडावर पाडू शकते आणि अशा महिलांपासून नेहमी सावध राहावे.