टाइम्स मराठी । आचार्य चाणक्य म्हणजे विष्णुगुप्त शिरोमणी. ते प्राचीन भारतीय राजनीती शास्त्रज्ञ असून चाणक्य म्हणून त्यांची सर्वत्र ओळख आहे. आचार्य चाणक्य (Chanakya Niti) यांनी जीवनात बऱ्याच वाईट गोष्टींचा सामना करत आयुष्य चांगल्या प्रकारे जगले आहे. आयुष्य कस जगावं? यशस्वी होण्यासाठी काय करावं? पैसे मिळवण्यासाठी काय करावं? इथपासून ते वैवाहिक जीवन, शिक्षणापर्यंत चाणक्य यांनी काही मार्गदर्शक सल्ले दिले आहेत. या सोबतच आचार्य चाणक्य यांनी कुटुंब, वैवाहिक जीवन, माता पिता, संतान यांच्याबाबत देखील काही नीती सांगितल्या आहेत.
जर तुम्ही समाजामध्ये मानसन्मान मिळवून इच्छित असाल तर तुम्हाला काही वाईट आणि चुकीच्या सवयी सोडाव्या लागतील. नाहीतर लोक तुमची प्रशंसा करण्यापेक्षा हसू उडवतील. आचार्य चाणक्य यांनी चाणक्यनीति (Chanakya Niti) मध्ये मानवाच्या अशा सवयींबद्दल सांगितलं आहे की ज्यामुळे त्यांना अपमान सहन करावा लागू शकतो. या काही सवयी मानवाचा व्यवहार आणि चरित्र बिघडवू शकतात. त्यामुळे चाणक्यनीती नुसार , जीवनात मानसन्मान मिळवण्यासाठी आपल्याला काही गोष्टींचा त्याग करावा लागेल. चला तर मग जाणून घेऊया ..
१) अहंकार
आचार्य चाणक्य यांच्यानुसार, एखाद्या व्यक्तीमध्ये जर अहंकार मोठ्या प्रमाणात असेल तर समाजात अशा व्यक्तींचा अपमान केला जातो. त्यांच्याबद्दल कधीच मधुर बोलले जात नाही. आणि अहंकारिक व्यक्तीसोबत बोलणे संवाद साधने प्रत्येक जण टाळत असतो. अहंकार हा व्यक्तीचा सर्वात मोठा दुश्मन असतो. परंतु तुम्ही जर सतत अहंकार बाळगून चालत असाल तर तुम्हाला समाजात अपमान सहन करावा लागेल. आणि असा परिणाम तुमच्या आरोग्यावर देखील दिसू शकतो. अहंकार बाळगल्यामुळे समाजातच नाही कुटुंबांमधील सदस्यांमध्ये देखील घट्ट नाते बनवता येत नाही.
२) टीका करणे– Chanakya Niti
बऱ्याच व्यक्तींना दुसऱ्यांच्या चुका काढण्यामध्ये आनंद मिळत असतो. असे व्यक्ती प्रत्येक वेळेस दुसऱ्यांच्या चुका काढून त्यांना हिणवत असतात. परंतु यामुळे इतरांना त्रास होतो पण ते यामुळे स्वतःला हानी पोहोचवू शकतात. टीका करणाऱ्या व्यक्तीसोबत कधीच कोणी नीट बोलत नाही. असे व्यक्ती चुकीच्या नकारात्मक गोष्टींना बळ देतात. या व्यक्तींसोबत राहणे प्रत्येक व्यक्ती टाळत असतो. त्यामुळे असे व्यक्ती स्वतःला दुःखी आणि एकटे समजू लागतात. अशा व्यक्तींपासून लांब राहणे प्रत्येक जण योग्य समजत असते. त्यामुळे कधीच कोणावर टीका करू नये.
३) खोटं बोलणे
खोटं बोलणाऱ्या व्यक्तींवर कधीच कोणी विश्वास ठेवत नाही. समाजामध्ये खोटं बोलणाऱ्या व्यक्तींना मानसन्मान कधीच दिला जात नाही. त्याचबरोबर खोटं बोलून यशस्वी होणाऱ्या लोकांना कधीच सन्मान दिला जात नाही. त्याचबरोबर खोटं बोलणाऱ्या व्यक्तींना सतत अपमानाचा सामना करावा लागतो. यामुळे व्यक्तींचा आत्मविश्वास देखील कमी होतो. त्यामुळे कधीच कोणतीही गोष्ट खोटं बोलून करणे हे एखाद्या चुकी बरोबर आहे.
४) लालचीपणा-
पैशांची किंवा कोणत्याही गोष्टींची लालच किंवा लोभ करणे हे अत्यंत वाईट कृत्य असून, अशामुळे समाजामध्ये व्यक्तींना अपमान सहन करावा लागतो. समाजामध्ये बऱ्याच व्यक्तींना पैसे किंवा सोन्याचा प्रचंड लोभ असतो. या व्यक्तींना मोठ्या प्रमाणात पैसा आणि सोने हवे असे वाटते. परंतु या लोभामुळे समाजामध्ये त्यांना मानसन्मान दिला जात नाही. लोभी व्यक्ती कधीही दुसऱ्यांचा आनंद हेराहून घेत असतात. त्यामुळे कधीच लोक किंवा लालचीपणा ही सवय व्यक्तींनी सोडून द्यायला हवी.
५) राग –
बऱ्याच जणांना त्यांची एखादी गोष्ट मिळवण्यासाठी राग व्यक्त करणे ही घाण सवय असते. असे व्यक्ती कोणतीही गोष्ट रागाच्या भरातच मनवून घेतात. परंतु जास्त राग करणाऱ्या व्यक्तींना अपमान सहन करावा लागत असतो. समाजात त्यांच्यासोबत वेळ घालवण्यास किंवा संवाद साधण्यास कोणताही व्यक्ती तयार होत नाही. सतत राग राग करणाऱ्या व्यक्तींसोबत कोणताच व्यक्ती राहत नाही. यामुळे असे व्यक्ती चिंतेत आणि तणावग्रस्त राहतात. आणि रागाच्या भरात असे व्यक्ती चुकीचा निर्णय घेतात. त्यामुळे व्यक्तींनी राग राग करणे टाळले पाहिजे.
६) द्वेष-
तिरस्कार ही अशी एक भावना आहे, ज्यामुळे व्यक्तींना अपमानित व्हावे लागू शकते. तिरस्कार देखील माणसाचा खूप मोठा दुश्मन आहे. बऱ्याच व्यक्तींना एखाद्या व्यक्तीला बघून तिरस्कार याची भावना निर्माण होत असते. किंवा बरेच जण दुसऱ्या व्यक्तींबद्दल तिरस्कार किंवा द्वेष दाखवतात. परंतु अशा व्यक्तींना समाजामध्ये योग्य स्थान दिले जात नाही. तिरस्कार करणाऱ्या व्यक्तींना सतत अपमानित व्हावे लागते. त्याचबरोबर प्रसंगी अशा व्यक्तींची कोणीही मदत करत नाही.