Chanakya Niti : गाढवातील हे 3 गुण आत्मसात करणे गरजेचे; जाणून घ्या काय सांगते चाणक्यनीती

Chanakya Niti : विष्णुपंत शिरोमणी  म्हणजेच आचार्य चाणक्य यांच्याबद्दल तर तुम्ही नक्कीच ऐकलं असेल किंवा वाचलं असेल. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये बऱ्याच संग्रहांचे लिखाण केले आहे. त्यापैकी चाणक्यनीती हा संग्रह मोठ्या प्रमाणात  प्रसिद्ध आहे. त्यांनी जीवनात येणाऱ्या अडचणींवर कशा पद्धतीने मात केली पाहिजे यावर भाष्य केले.  यासोबतच ते यशस्वी होण्यासाठी काही महत्त्वाच्या नीती देखील सांगतात. या नीती आपण आचरणात आणल्यास येणाऱ्या अडचणींवर मात करू शकतो.

   

आचार्य चाणक्य यांच्या मते, (Chanakya Niti) प्रत्येक व्यक्तीने  गाढवा कडून ३ गोष्टी शिकण्यासारख्या आहे असं चाणक्य म्हणतात.  चाणक्य नीति चे एकूण 17 अध्याय आहेत. त्यापैकी  6 व्या अध्यायामध्ये, आचार्य चाणक्य सांगतात की, प्रत्येक व्यक्तीने गाढवातील हे तीन गुण शिकले पाहिजे. जो व्यक्ती हे तीनही गुण आचरणात आणतो तो व्यक्ती जीवनात कधीही अपयशी ठरत नाही. त्या व्यक्तींना नेहमी यश मिळेल आणि कधीही फसवणूक होणार नाही. जाणून घेऊया कोणते आहेत हे तीन गुण.

१) आळशीपणा दूर करणे 

आचार्य चाणक्य यांनी या श्लोकात पहिला गुण सांगितला आहे. तो म्हणजे आळसा पासून अंतर ठेवणे. गाढव हा ओझे वाहून येणारा प्राणी म्हणून आपण ओळखतो. परंतु या प्राण्याकडे असे काही गुण आहेत  ज्याकडे कोणीच दुर्लक्ष करू नये. प्रत्येक व्यक्तीने मेहनत घेण्यासाठी आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आळस काढून टाकला पाहिजे. कारण आळस ही गोष्ट तुम्हाला आयुष्यात कधीच पुढे जाऊ देत नाही. गाढव हा प्राणी कधीच आळशी नसतो. हा प्राणी कधीही थकलेला असला तरी देखील ओझे वाहतो. याच प्रमाणे माणसाने देखील गाढवाचा हा गुण आत्मसात करायला हवा. जेणेकरून आळशीपणा सोडून कठोर परिश्रम करून यश मिळवता येईल.

२) वातावरणाची काळजी न करणे 

गाढवाला कधीच कोणत्याच वातावरणाची काळजी नसते. गाढव हा प्राणी कोणत्याच वातावरणाची चिंता न करता काम करतो. गाढवाचा हा गुण प्रत्येक व्यक्तीने आचरणात आणला पाहिजे. यानुसार व्यक्तींनी कधीच काम करण्यासाठी वातावरणाचा बहाना देऊ नये. आणि स्वतःचे काम पुढे ढकलू नये. आजचे काम उद्यावर ढकलल्यामुळे स्वतःचे नुकसान होते. आणि यश प्राप्त होत नाही.

३) समाधानी राहणे – Chanakya Niti

गाढवाचा तिसरा आणि महत्त्वाचा गुण म्हणजे समाधानी राहणे. हा गुण प्रत्येक व्यक्तीमध्ये असतो असं नाही. हातावर मोजण्या एवढे व्यक्ती असतील त्यांच्यामध्ये समाधानी असल्याचे दिसून येईल. जर तुम्ही गाढवाचा हा गुण अंगीकारला आणि समाधानी राहायला शिकलात तर तुमच्या अर्ध्या अडचणी दूर होऊ शकतात. जे व्यक्ती आयुष्यामध्ये समाधानी राहतात ते नेहमी आनंदी असतात. असे व्यक्ती प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद शोधत असतात. जर तुम्हाला यशस्वी आणि आनंदी जीवन जगायचे असेल तर समाधानी आवश्यक आहे.