Chanakya Niti : आयुष्यात अत्यंत महत्वाच्या आहेत आचार्य चाणक्य यांच्या ‘या’ नीती

टाइम्स मराठी । आचार्य चाणक्य लिखित चाणक्य नीति ही जगात प्रसिद्ध आहे. चाणक्य नीति आचरणात आणल्यास जीवनात येणाऱ्या अडचणींवर सहजरीत्या मात करता येऊ शकते. आचार्य चाणक्य हे जीवनात येणाऱ्या अडचणींवर कशा पद्धतीने मात केली पाहिजे याबद्दल भाष्य करत असतात. तुम्ही देखील एखाद्या  वाईट परिस्थितीमध्ये फसले असाल तर आचार्य चाणक्य यांच्या नीती तुम्हाला त्या परिस्थितीतून बाहेर काढण्यास मदत करू शकतात. जेणेकरून तुम्हाला  आलेल्या परिस्थितीचा सामना करता येईल.

   

1) आचार्य चाणक्य यांच्यानुसार, जेव्हा एखादी व्यक्ती स्त्रियांबद्दल घाणेरडे विचार, अर्धवट ज्ञान, पाचन समस्या, या गोष्टी सोडेल  तेव्हाच तो चांगले जीवन जगू शकतो. अर्धवट ज्ञान असलेले व्यक्ती कधीच आयुष्यात  यशस्वी होऊ शकत नाही. त्यामुळे अर्धवट ज्ञान हे हानिकारक असल्याचे चाणक्य सांगतात. स्त्रियांबद्दल घाणेरडे विचार करणारे व्यक्ती कधीच चांगले जीवन जगू शकत नाही. त्यांच्या मनात सतत वाईट विचार असतात.

2) प्रत्येक व्यक्तीला जीवन जगताना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो. परंतु जे व्यक्ती त्यांना आलेल्या आर्थिक अडचणींची चर्चा इतर व्यक्तींसोबत करतात ते व्यक्ती जीवनात कधीच सुखी राहू शकत नाही. बुद्धिमान व्यक्ती कधीच आर्थिक समस्यांबद्दल इतरांसोबत चर्चा करत नाही. जर तुम्ही देखील आर्थिक समस्येला सामोरे जात असाल तर या गोष्टी इतरांना सांगत बसू नका. स्वतःच्या समस्या स्वतःपुरता मर्यादित ठेवा.

3) आयुष्यात खरे बोलणारे आणि पाठीमागे बोलणारे दोन व्यक्ती असतात. सतत एखादी व्यक्ती तुमची वाहवा करत असेल तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका. बऱ्याचदा काही व्यक्ती आपल्या तोंडावर चांगले बोलतात आणि पाठीमागे आपल्या बद्दल वाईट बोलतात. आचार्य चाणक्य यांच्या मते, अशा व्यक्तींपासून सतत लांब राहिले पाहिजे. पाठीमागे वाईट बोलणाऱ्या व्यक्तींना भेटणे टाळले पाहिजे.

4) आचार्य चाणक्य सांगतात की, ज्यांनी तुम्हाला जन्म दिला, ज्यांनी पवित्र धागा बांधला, तुम्हाला शिकवले, तुम्हाला अन्न दिले, वाईट परिस्थिती पासून संरक्षण केले ते तुमचे पाच पिता आहे.

5) आचार्य चाणक्य सांगतात की, जे व्यक्ती त्यांचे ध्येय निश्चित करू शकत नाही, ते व्यक्ती जीवनात कधीच यशस्वी होऊ शकत नाही. जीवनात यशस्वी होण्यासाठी ध्येय निश्चित करणे अत्यंत गरजेचे आहे.

6) बऱ्याच व्यक्तींना इतर व्यक्तींना जीवनातील बऱ्याच गोष्टी शेअर करण्याची सवय असते. परंतु हे अत्यंत चुकीचे असून, जीवनात तुम्ही बनवत असलेल्या योजना नेहमी गुप्त ठेवायला पाहिजे. जेणेकरून  तुम्ही तुमच्या योजनेत यशस्वी होऊ शकतात. कोणालाही न सांगता तुम्ही ध्येयाकडे वाटचाल केली तर तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकतात.

7) आचार्य चाणक्य सांगतात, जेवण करताना, अभ्यास करताना, व्यवसायासंबंधीत भाष्य करताना कधीही लाज बाळगू नका.