Chanakya Niti : या व्यक्तींपासून वेळीच लांब व्हा, अन्यथा होईल मोठं नुकसान

Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांची चाणक्य नीति ही ज्येष्ठांपासून लहानांपर्यंत सर्वांना मार्गदर्शन करत असते. आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या नितीचे पालन केल्यास प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी कोणीही रोखू शकणार नाही. आचार्य चाणक्य यांनी बऱ्याच  संग्रहाचे लिखाण केले आहे. त्यापैकी नीतिशास्त्र हा एक संग्रह आहे. या नीतीशास्त्र संग्रहामध्ये आचार्य चाणक्य यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी कोणत्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे याबाबत भाष्य केले आहे. याशिवाय आयुष्यामध्ये येणाऱ्या संकटांचा सामना कशा पद्धतीने करायला हवा हे देखील चाणक्य सांगतात.

   

आचार्य चाणक्य यांनी प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये घडत असलेल्या किंवा घडणार असलेल्या प्रत्येक मुद्द्याबद्दल सांगितले आहे. यासोबतच आयुष्यामध्ये कोणत्या व्यक्तींपासून लांब राहणे गरजेचे आहे हे देखील चाणक्य सांगतात. आपल्या आयुष्यामध्ये बरेच व्यक्ती आपल्या पाठीमागे वाईट बोलत असतात. ज्यामुळे इतरांच्या नजरेत तुमची इज्जत कमी होते. म्हणूनच अशा व्यक्तींपासून लांब राहणे गरजेचे आहे.

दृष्ट व्यक्तींपासून लांब राहणे गरजेचेChanakya Niti

आचार्य चाणक्य यांच्या मते, (Chanakya Niti) दुष्ट व्यक्तींपासून  लांब राहणे गरजेचे आहे. कारण दृष्ट व्यक्ती कधी कोणाला धोका देईल, नुकसान पोहोचवेल सांगता येत नाही. आयुष्यामध्ये बऱ्याचदा लोभी, लालची व्यक्ती भेटत असतात. या लालची स्वभावाच्या व्यक्तींपासून लांब राहिल्यास  तुम्ही तुमचे आयुष्य सुखदायी  जगू शकतात. असे व्यक्ती इतरांना सतत नुकसान पोहोचवतात. आणि कोणत्याच कामात येत नाही. ते तुमची गोड बोलून फसवणूक  करण्याच्या प्लॅनमध्ये असतात.

शस्त्रे सोबत ठेवणाऱ्या व्यक्तींपासून लांब राहा

ज्या व्यक्तीकडे शस्त्रे आहे त्यांच्यासोबत कधी मैत्री करू नका. चाणक्यनीति नुसार, शस्त्र बाळगणाऱ्या व्यक्तींसोबत मैत्री केल्यास मैत्रीचे रूपांतर कधीही शत्रुत्वामध्ये होऊ शकते. आणि यामुळे तुमची मैत्री देखील खराब होऊ शकते. याशिवाय  ज्या व्यक्तीकडे जास्त पैसे आहे, त्यांच्यावर विश्वास ठेवू नये. पैसे असलेले व्यक्ती स्वतःचा फायदा करून घेतात. आणि असे व्यक्ती फायद्यासाठी तुम्हाला हानी पोहोचवू शकतात.

ताकतवान आणि रागीट व्यक्तींपासून रहा लांब

चाणक्यनीतीनुसार, (Chanakya Niti) जे व्यक्ती ताकदवान, क्रोधी असतात. अशा व्यक्तींसोबत राहिल्यास  तुम्हाला धोका निर्माण होऊ शकतो. क्रोधी व्यक्ती कधी स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवत नाही. अशा व्यक्तीच्या रागामुळे तुम्ही अडचणीमध्ये येऊ शकतात. याशिवाय ताकदवान व्यक्ती देखील अत्यंत रागीट असतात. त्यांच्या रागीट स्वभावामुळे ते कधी काय करतील हे सांगता येत नाही. म्हणून कधीच अशा व्यक्तीं पासून लांब रहा.