टाइम्स मराठी । आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांच्या चाणक्य नीतिचे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण पालन करत असतात. आचार्य चाणक्य यांनी या नीतीमध्ये यशस्वी होण्याचे मार्ग, जीवन साध्या पद्धतीने जगण्याचे मार्ग यासारखे अनेक मार्ग सांगितले आहेत. ज्याचा फायदा आपल्याला प्रत्येक परिस्थितीमध्ये होतो. आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीति प्रमाणे नीतिशास्त्र, यासारख्या बऱ्याच संग्रहाचे लेखन केले आहे. चाणक्य म्हणतात, तुमचं भविष्य उज्वल बनवण्यासाठी काही गोष्टींचा विचार करणे आणि ते विचार आचरणात आणणे गरजेचे आहे. त्याचबरोबर जीवनात यशस्वी होण्यासाठी वाईट लोकांपासून दूर राहणे देखील गरजेचे असल्याचं सांगितलं आहे. चाणक्यनीति मध्ये सांगताना त्यांनी म्हंटल आहे की, दैनंदिन जीवनामध्ये मुद्दाम अशी कोणती चूक करू नये ज्यामुळे देवी लक्ष्मी तुमच्यावर नाराज होईल. मुद्दाम केलेल्या काही चुकांमुळे लक्ष्मी क्रोधित होते. आणि त्यामुळे व्यक्तींच्या जीवनामध्ये पैशाची कमतरता निर्माण होते. चला जाणून घेऊया याबाबत सविस्तर
१) किचन मध्ये उष्टे भांडे ठेवू नये
आचार्य चाणक्य यांच्या मते, घरासोबतच किचनची साफसफाई करणे देखील अत्यंत गरजेचे आहे. त्याचबरोबर जेवण झाल्यानंतर महिला उष्टे भांडे तसेच पडू देतात. किचनमध्ये कधीच उष्टे भांडे ठेवू नका. बऱ्याचदा आपण रात्रीचे जेवणाचे भांडे घासण्याचा कंटाळा करतो. त्यामुळे ते भांडे तसेच पडून राहते . त्यामुळे माता लक्ष्मी नाराज होते आणि घरामध्ये दरिद्री वाढते.
२) अनावश्यक खर्च टाळा
आचार्य चाणक्य यांच्यामते प्रत्येक व्यक्तीला पैसे कमावण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. त्याचबरोबर पैसे कमवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने मेहनत घेणे अत्यंत गरजेचे आहे. परंतु बऱ्याचदा पैसा आल्यावर अनावश्यक खर्च अनेकजण जण करतात. काहीजण तर कोणत्याही ठिकाणी पैशाची उधळपट्टी करतात. हे चुकीचं असून यामुळे माता लक्ष्मी नाराज होते. त्यामुळे कधीही अनावश्यक गोष्टींसाठी पैसे खर्च करू नये. असा व्यक्ती स्वतः च्या हाताने कंगाल होतो .
३) संध्याकाळी घर झाडू नये
आचार्य चाणक्य यांच्या मते संध्याकाळी कधीच घराला झाडू पोछा मारू नका. कारण माता लक्ष्मी संध्याकाळच्या वेळेला घरात येते. दरवाजामध्ये घाण बघितल्यानंतर लक्ष्मी परत जाते. बरेच जण संध्याकाळच्या वेळेला घर साफ करतात. हे अत्यंत चुकीचे असून संध्याकाळ पूर्वी घर साफ केल्यास माता लक्ष्मी घरात येण्याच्या वेळेला घर साफ दिसेल. आणि माता लक्ष्मीचा घरामध्ये वास राहील.
४) कोणाचाही अपमान करू नये
आचार्य चाणक्य यांच्या मते, मनुष्याची वागणूक आणि व्यवहारावरून त्याचा स्वभाव समजत असतो. त्याचबरोबर जो मनुष्य वृद्ध, विद्वान, गरीब, आणि महिलांचा अपमान करतो, त्यांच्या घरात कधीच माता लक्ष्मी येत नाही. बऱ्याच व्यक्ती स्वतःला मोठे समजून दुसऱ्यांचा अपमान करत असतात. त्याचबरोबर गरिबाला अशा व्यक्ती कधीच मदत करत नाही. जर दुसऱ्यांसोबत चुकीचा व्यवहार केला तर माता लक्ष्मी त्यांच्यावर नाराज होते. त्यामुळे कधीही कोणत्याही व्यक्तीसोबत आदराने वागा.