Chanakya Niti : आई- वडिलांनी मुलांसमोर कधीच करू नयेत ‘या’ गोष्टी

टाइम्स मराठी । आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) एक प्राचीन भारतीय राजनीती शास्त्रज्ञ होते. चाणक्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे लेखन केलं आहे, त्यातील चाणक्य नीती (Chanakya Niti) मधून त्यांनी मनुष्यला अनेक मार्गदर्शक सल्ले दिले आहेत. आयुष्य कस जगावं? यशस्वी होण्यासाठी काय करावं? सुखाचा संसार होण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी करू नये याबाबत चाणक्यांनी अनेक तत्वे सांगितली आहे. आचार्य चाणक्य यांच्या मते घरात असलेले लहान मुलं त्यांच्या आई-वडिलांपासूनच काही गोष्टी शिकत असतात.  त्यामुळे माता-पितांनी कधीच मुलांसमोर काही गोष्टी करणे टाळले पाहिजे.  नाहीतर मुलांच्या आयुष्यावर वेगळा परिणाम पडू शकतो आणि आईवडिलांना मग आयुष्यभर पश्चात्ताप करावा लागू शकतो. नेमक्या कोणत्या आहेत या गोष्टी ते जाणून घेऊया….

   

मुलांसमोर भांडू नका

आचार्य चाणक्य सांगतात माता-पितांमध्ये असलेले भांडण विवाद एकमेकांसोबत बोलून मिटवले पाहिजे. कोणतेही भांडण मुलांसमोर आणले नाही पाहिजे. मुलांसमोर भांडण केल्यास त्यांच्यावर देखील वाईट परिणाम दिसून येतो. आणि त्यांचे मानसिक स्वास्थ्य आणि भविष्य अंधारात जाऊ शकते.

मुलांच्या भविष्यासाठी गंभीर रहा

आचार्य चाणक्य सांगतात,  माता पितांनी त्यांच्या बालकांच्या भविष्यासाठी आणि शिक्षण आणि आरोग्य या संबंधित गंभीर राहिले पाहिजे. बालकांचे भविष्य हे माता-पितांच्या हातात असते. जोपर्यंत बालक समजूतदार होत नाही तोपर्यंत त्यांना दिशा दाखवण्याचं काम माता पिता यांचं असतं. त्यानुसार भविष्यामध्ये काय करायचे आहे यासाठी योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर बालकांना शिक्षित करणे, संस्कार देणे त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हे देखील माता पितांचे काम आहे.

मुलांसमोर खोटे बोलू नये

आचार्य चाणक्य यांच्यानुसार, माता-पितांनी कधीच बालकांसमोर खोटं बोलू नये.  यामुळे मुलांवर देखील तोच परिणाम दिसून येतो. माता पिता ज्याप्रमाणे वागतील त्याच प्रकारे मुलं वागत असतात. त्यामुळे मातापितांनी बालकांसमोर कधीच खोटं बोलू नये आणि दिखावा करू नये.  असं केल्यामुळे बालकांच्या नजरेमध्ये माता पिता चा मानसन्मान कमी होतो. आणि त्यांना चुकीचे मार्गदर्शन मिळते. माता-पितांनी कधीही मुलांना इमानदारी आणि जबाबदारीचे महत्त्व शिकवले पाहिजे. जेणेकरून त्यांना स्वाभिमान आणि जबाबदारीचे महत्त्व समजेल.

वृद्धांसोबत गैर व्यवहार करू नका

आचार्य चाणक्य यांच्या मते , नातेवाईकांना मानसन्मान देणे, घरात असलेल्या वृद्ध व्यक्तींचा सन्मान करणे त्यांना आदर देणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर माझा पिता वृद्धांसोबत योग्य व्यवहार करत नसतील, त्यांना आदर मानसन्मान देत नसतील तर मुलांच्या मनावर मानसिक वाईट प्रभाव दिसून येतो. आणि ते देखील इतरांसोबत तसेच वागतात. जर माता-पिता घरामध्ये  वृद्ध व्यक्तींची काळजी घेत असतील, नात्यांमध्ये सन्मान देत असतील, आणि माता पिता मुलांची काळजी आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करत असेल तर चांगला प्रभाव त्यांच्यावर पडतो. यामुळे मुलांच्या भविष्यामध्ये त्यांना योग्य मार्गदर्शन मिळते.