Chanakya Niti : मुलगा आणि वडिलांच्यात कसे संबंध असावे? पहा काय सांगते चाणक्यनीती?

Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांनी अर्थशास्त्र, नीतीशास्त्र, राजनीति शास्त्र यासारख्या संग्रहांचे लिखाण केले आहे. त्यापैकी चाणक्यनीती हा संग्रह लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत  सर्व व्यक्तींसाठी गरजेचा आहे.  आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीती मधून सांगितलेल्या काही गोष्टींचे पालन केल्यास  प्रत्येक व्यक्ती यशस्वी होऊ शकतो. या सोबतच आचार्य चाणक्य यांनी जीवनात येणाऱ्या प्रत्येक अडचणींवर कशा पद्धतीने मात केली पाहिजे, वैवाहिक जीवन, काही वाईट सवयी, धनसंपत्ती, यासारख्या बऱ्याच गोष्टींवर भाष्य केले आहे. त्यानुसार आजच्या चाणक्य नीति मधील  यशस्वी जीवनासाठी मुलगा आणि वडिलांचे नाते कशा पद्धतीने हवे याबद्दल देखील सांगितले आहे. चला जाणून घेऊयात……

   

लालयेत् पंचवर्षाणि दशवर्षाणि ताडयेत् ।
प्राप्ते तु षोडशे वर्षे पुत्रं मित्रवदाचरेत् ।।

वर दिलेल्या श्लोकानुसार, पाच वर्षापर्यंत मुलाचे लाड केले पाहिजे. त्यानंतर दहा वर्षापर्यंत तारण केले पाहिजे. 16 व्या वर्षात मित्राप्रमाणे व्यवहार करायला पाहिजे.

आचार्य चाणक्य यांनी प्रत्येक वडिलांनी त्यांच्या मुलांसोबत  कशा पद्धतीने व्यवहार करायला हवा याबद्दल सांगितले आहे. त्यानुसार जर तुमचा मुलगा 5 वर्ष किंवा त्या खालील वयात आहे तर  त्या मुलाला वाईट व्यवहार, कठोर बोली पासून लांब ठेवायला हवे. 5 वर्षापर्यंत मुलांसोबत वडिलांचा व्यवहार मधुर असणे गरजेचे आहे. 5 वर्षांपर्यंत मुलांवर संस्कार होत असतात. या काळात चांगले संस्कार होणे गरजेचे आहे.

10 वर्षापर्यंत वडिलांनी मुलाची काळजी घेतली पाहिजे. म्हणजेच मुलाच्या प्रत्येक गोष्टीवर वडिलांची नजर हवी. 10 वर्षानंतर जेव्हा मुलगा 16 वर्षांचा होतो, तेव्हा वडिलांनी मुलासोबत मित्राप्रमाणे व्यवहार करायला हवा. जेणेकरून मुलगा सर्व महत्वपूर्ण गोष्टी वडिलांना सांगू शकेल. असे केल्यास  मुलगा आणि वडिलांचे नाते अतूट राहते. आणि मुलाचे उज्वल भविष्याचे स्वप्न पूर्ण होते.