Chanakya Niti : देवापेक्षाही श्रेष्ठ आहे ‘ही’ व्यक्ती; पहा काय सांगते चाणक्यनीती?

टाइम्स मराठी । नितीशास्त्र हा संग्रह तुम्हाला सर्वांना माहित असेल. आचार्य चाणक्य यांनी लिहिलेला हा संग्रह लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व व्यक्तींना प्रत्येक पावलावर उपयोगी ठरत असतो. आचार्य चाणक्य यांनी नीतीशास्त्र किंवा चाणक्य नीति या संग्रहाच्या माध्यमातून आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर कशा पद्धतीने मात केली पाहिजे हे सांगितले आहे. आचार्य चाणक्य यांची चाणक्यनीति (Chanakya Niti) आचरणात आणल्यास प्रत्येक व्यक्ती आयुष्यात यश प्राप्त करेल. आचार्य चाणक्य यांच्या नितीशास्त्र यानुसार, देवतांपेक्षा देखील महान असे व्यक्ती आहेत. जे की आयुष्यात अत्यंत मौल्यवान आहेत. जाणून घेऊया देवांपेक्षा महान चाणक्य यांनी कोणाला म्हटले आहे.

   

अन्न आणि पाणी दान

आचार्य चाणक्य (Chanakya Niti) यांच्यानुसार, अन्न आणि पाणी या दोन गोष्टींचे दान करण्याशिवाय दुसरे कोणतेच धर्मदाय मोठे नाही. जे व्यक्ती भोजन केल्यानंतर इतरांना पाणी पाजतात, ते दान नाही तर महादान आहे. आचार्य चाणक्य यांच्यानुसार प्रत्येक व्यक्तीने अन्न आणि पाणी या गोष्टींचे दान केले पाहिजे. ज्यामुळे देवांचा आशीर्वाद न घेता ही तुम्हाला आशीर्वाद मिळेल.

गायत्री मंत्र आणि द्वादशी तिथी

आचार्य चाणक्य सांगतात की, द्वादशी तिथी पेक्षा उत्तम आणि श्रेष्ठ कोणतीच तिथी नाही. द्वादशी तिथी ही सर्वात मोठी तिथी आहे. यासोबतच गायत्री मंत्राशिवाय कोणताच दुसरा मंत्र महान नाही. त्यामुळे गायत्री मंत्राचा जप प्रत्येकाने केला पाहिजे. जेणेकरून आशीर्वाद मिळेल.

आई आहे सर्वात श्रेष्ठ– Chanakya Niti

आचार्य चाणक्य सांगतात की, जीवनात देवांपेक्षा ही सर्वात श्रेष्ठ ही आई असते. चाणक्य यांनी जीवनामध्ये आईला सर्वोच्च स्थान दिले आहे. जगातील कोणताच देव हा आईची बरोबरी करू शकत नाही. त्यामुळे जे व्यक्ती आईची पूजा करतात, आईचा आशीर्वाद घेतात त्यांना सेवेचे फळ नक्कीच मिळते. चाणक्य नीतीनुसार, आईची पूजा केल्याचे फळ ज्या प्रकारे मिळते त्या प्रकारे देवांच्या सेवेने मिळत नाही. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आईची सेवा केली पाहिजे. आईची सेवा आणि आशीर्वाद हे सर्वात जास्त गरजेचे असतात. जे व्यक्ती आपल्या आईची सेवा करतात ते सर्वात श्रेष्ठ असतात. अशा व्यक्तींना देव देखील आशीर्वाद देतो. परंतु जे व्यक्ती आईला दुखावतात ते व्यक्ती कधीच देवाचा आशीर्वाद मिळवू शकत नाही.