Chanakya Niti: ‘या’ 3 प्रकारची माणसे आयुष्यभर गरीबच राहतात; नशीबही देत नाही साथ

टाइम्स मराठी । आचार्य चाणक्यांनी हे महान नीतिशास्त्रतज्ज्ञ मानले जातात. चाणक्यांनी केलेल्या लिखाणाचे आणि नितीचे बरेच जण पालन करत असतात. जीवन कसे जगावे, यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठीचे मार्ग, यश मिळवण्यासाठी गरजेचे प्रयत्न, यासोबतच जीवनात कोणत्या गोष्टी करणे गरजेचे आणि वैवाहिक जीवन जगताना कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागतो यासारख्या बऱ्याच अडचणी चाणक्य नीति या साहित्यातून आचार्य चाणक्य दूर करतात.आचार्य चाणक्य म्हणतात की, जीवनामध्ये तीन प्रकारचे लोक कधीच श्रीमंत होऊ शकत नाही. अशा व्यक्तींना त्यांचं नशीब कधीच साथ देत नाही. याबाबत आज आपण चाणक्यनीति च्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

   

1) चारित्र्यहीन पत्नीचा सांभाळ केल्यास त्या व्यक्ती गरीब राहतात

वैवाहिक जीवनात पती-पत्नी दोघांचेही स्वभाव वेगवेगळे असतात. त्यानुसारच चारित्र्यहीन पत्नीचे एखादा व्यक्ती पालन पोषण करत असेल तर तो व्यक्ती आयुष्यभर गरीबच राहतो. असा व्यक्ती कधीच श्रीमंत होऊ शकत नाही. यासोबतच त्यांच नशीब देखील त्यांना साथ देत नाही. असे लोक संपूर्ण आयुष्य दुःखी आणि गरीब राहतात. कारण दृष्ट आणि चरित्रहीन पत्नी कधीच परिवार सांभाळत नाही आणि परिवाराचे चांगले देखील करू शकत नाही. अशी पत्नी कधीही स्वतःच चांगलं करण्याचा प्रयत्न करते. अशा पत्नीचे खाणं पिणं देखील महाराणी प्रमाणेच असते त्यामुळे तिचे पालन पोषण करणारा व्यक्ती गरीबच राहतो.

2) दुःखी आणि गरीब व्यक्तीसोबत करू नका मैत्री

जीवनामध्ये मैत्री करणे गरजेचे आहे परंतु दुःखी व्यक्तीसोबत कधीच मैत्री करू नका. कारण यामुळे तुम्ही देखील दुखी आणि गरीब राहू शकतात. मित्राची हालत चांगली करण्यासाठी बरेच लोक आर्थिक मदत करतात परंतु गरीब व्यक्ती कधीच स्वतः काम करत नाही. त्यामुळे समोरचा व्यक्ती मदत करून कंगाल होऊन जातो. त्यामुळे अशा व्यक्तींसोबत असलेली मैत्री हे कष्टदायक होते. त्यामुळे आचार्य चाणक्य म्हणतात की कधीच दुःखी आणि गरीब व्यक्तीसोबत मैत्री करू नका.

3) प्रकांड पंडितांनी कधीच या व्यक्तींसोबत करू नये मैत्री

आचार्य चाणक्य म्हणतात की, प्रकांड पंडितांनी देखील मूर्ख व्यक्तींसोबत कधीच मैत्री करू नये. कारण दान मागून जीवन जगणाऱ्या पंडितांना देखील मूर्ख व्यक्ती संकटात पाडू शकतो. जेव्हा एखाद्या मूर्ख व्यक्तीला उपदेश केला जातो किंवा चांगला संदेश दिला जातो. तेव्हा तो उलट पंडितलाच सर्व घडलेल्या घटनेला जबाबदार मानतो.