Chanakya Niti : ‘या’ चुकांमुळे तुमच्याही संपत्तीत होईल घट; पहा काय सांगते चाणक्यनीती?

टाइम्स मराठी । आचार्य चाणक्य यांच्या चाणक्य नीतीचे (Chanakya Niti) लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण पालन करत असतात. आचार्य चाणक्य यांनी या नीती मध्ये यशस्वी होण्याचे मार्ग, जीवन साध्या पद्धतीने जगण्याचे मार्ग यासारखे अनेक मार्ग सांगितले आहेत. ज्याचा फायदा आपल्याला प्रत्येक परिस्थितीमध्ये होतो. आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीति प्रमाणे नीतिशास्त्र, यासारख्या बऱ्याच संग्रहाचे लेखन केले आहे. चाणक्य म्हणतात तुमचं भविष्य उज्वल बनवण्यासाठी काही गोष्टींचा विचार करणे आणि ते विचार आचरणात आणणे गरजेचे आहे. त्याचबरोबर जीवनात यशस्वी होण्यासाठी वाईट लोकांपासून आणि सवयी दूर राहणे देखील गरजेचे असल्याचं सांगितलं आहे. दैनंदिन जीवनामध्ये मुद्दाम अशी कोणती चूक करू नये ज्यामुळे देवी लक्ष्मी तुमच्यावर नाराज होईल हे सुद्धा चाणक्य नीति (Chanakya Niti) मध्ये सांगितलं आहे. आचार्य चाणक्य यांच्या मते मुद्दाम केलेल्या काही चुकांमुळे लक्ष्मी क्रोधित होते. आणि त्यामुळे व्यक्तींच्या जीवनामध्ये पैशाची कमतरता निर्माण होते. चला तर त्याबाबत जाणून घेऊयात .

   

१) स्वतःचा विचार करणारे लोक

आचार्य चाणक्य यांच्या मते, जो व्यक्ती कधीही स्वतःचा विचार करतो त्यांच्यासोबत राहणे टाळले पाहिजे. असे व्यक्ती कधीच प्रियकर प्रेयसीला वेळ देत नाही. त्यांच्या नात्याला वेळ देत नाही. यामुळे त्यांचे नाते तुटते. असे व्यक्ती स्वतःचा स्वार्थासाठी त्या व्यक्तीसोबत राहत असतात. मी स्वतःचा विचार करतात. अशा लोकांकडे लक्ष्मी पाठ फिरवते.

२) संपत्तीची हाव– (Chanakya Niti)

आचार्य चाणक्य म्हणतात की, संपत्ती मिळवण्यासाठी लालची भावना तुम्हाला पैशापासून वंचित करू शकते. तुम्ही मेहनतीच्या बळावर पैसे कमवू शकतात. पण तुम्ही दुसऱ्यांच्या संपत्तीवर डोळा टाकत असाल तर ते अयोग्य आहे. त्याचबरोबर जर तुम्ही पुण्य करत नसाल तर तुमची परिस्थिती बिघडू शकते. आचार्य चाणक्य यांच्यानुसार भौतिक समृद्धीसाठी सतत प्रयत्न करण्यापेक्षा समाधान साठी प्रयत्न करा आणि गरजांची जाणीव ठेवा.

३) आजारी व्यक्तीस मदत करा

जो व्यक्ती पैसा कमवतो, त्या व्यक्तीवर संपूर्ण घराची जबाबदारी असते. त्यातच कुटुंबातील एखादा व्यक्ती आजारी पडल्यास त्याच्यावर खर्च करणे टाळणे चुकीचे आहे. कारण आपल्या कुटुंबांमधील प्रत्येक व्यक्ती महत्त्वाचा असतो. त्यामुळे कुटुंबातील व्यक्तींची काळजी घेणेदेखील गरजेचे आहे. एवढेच नाही तर तुमच्या ओळखीच्या किंवा मित्रांना आजारी व्यक्तीचा खर्च करण्यासाठी पैसे हवे असेल तर कधीच नाही म्हणू नका. तुम्ही पैसे दिल्यामुळे एखाद्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो.

४) पैशांची मदत करा

आचार्य चाणक्य यांच्या मते (Chanakya Niti) प्रत्येक व्यक्तीला पैसे कमावण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. परंतु बऱ्याचदा पैसा आल्यावर अनावश्यक खर्च बरेच जण करतात. हा अनावश्यक खर्च न करता तुम्ही एखाद्या व्यक्तीला मदत केल्यास तुम्हाला फायदा होऊ शकतो आणि लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न होऊ शकते.