Chanakya Niti : या व्यक्तींना कधीही मिळत नाही मान- सन्मान; चाणक्यनीती काय सांगते पहा

टाइम्स मराठी । नीतिशास्त्र या प्रसिद्ध संग्रहामध्ये आचार्य चाणक्य (Chanakya Niti) यांनी दैनंदिन जीवनामध्ये येणाऱ्या अडचणींवर मात करण्याच्या उपायावर प्रकाश टाकला आहे. आचार्य चाणक्य यांनी सुचवलेले उपाय हे दैनंदिन जीवनामध्ये उपयोगी पडतात. आचार्य चाणक्य आणि सांगितलेल्या काही उपायांचे पालन केल्यावर प्रत्येक व्यक्ती हा यशस्वी होऊ शकतो. आचार्य चाणक्य यांची चाणक्य नीति ही लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांच्या उपयोगाची आहे. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या जीवनामध्ये बऱ्याच वाईट परिस्थितीचा सामना करून जीवन जगले. त्यावेळी त्यांना आलेले अनुभव त्यांनी नीतीशास्त्र या संग्रहाच्या माध्यमातून सांगत त्यावर उपाय देखील सुचवले आहेत. चाणक्य यांनी सांगितलेल्या नीती चे पालन केल्यास प्रत्येक व्यक्ती हा यशस्वी होऊ शकतो. 

   

आचार्य चाणक्य (Chanakya Niti) यांनी आजच्या नीतीमध्ये मनुष्याच्या जीवनावर भाष्य केले आहे. आचार्य चाणक्य यांच्या मते जीवनामध्ये काही व्यक्तींपासून सतत दूर राहिले पाहिजे. जेणेकरून आपल्याला कोणतेच नुकसान होणार नाही. त्याचबरोबर आयुष्यामध्ये कधीच कोणतीच गोष्ट सहन करू नये. प्रत्येक गोष्ट सहन करत राहिल्यामुळे इतरांच्या मनात आपल्याबद्दल वाईट भावना निर्माण होऊ शकते. आणि यामुळे सहन करणारा व्यक्ती कधीच खुश राहू शकत नाही. आणि समाजमध्येही अशा व्यक्तींना मान- सन्मान मिळत नाही.

अपमान सहन करू नये

आचार्य चाणक्य यांच्या मते, मानसिक दृष्ट्या कमजोर असलेला व्यक्ती कधीच अपमान सहन करू शकत नाही. मानसिकदृष्ट्याच नाही तर प्रत्येक व्यक्तीला अपमान हा सहन होत नसतो. परंतु जे व्यक्ती सतत अपमान सहन करतात ते व्यक्ती जीवनभर घुटमळत राहतात. त्यामुळे कधीच कोणत्याच व्यक्तीने अपमान सहन करत राहू नये. एकदा अपमान सहन केल्यास आयुष्यभर अपमान सहन करावा लागतो. बऱ्याचदा मजबुरी मध्ये काही व्यक्तींना अपमानित व्हावे लागते.

अपमान सहन करणे चुकीचे– Chanakya Niti

जर एखादा व्यक्ती तुमचा अपमान करत असेल तर तुम्ही एखाद्या वेळेस दुर्लक्ष करू शकतात. परंतु सतत जर तुम्ही अपमानित होत असाल तर त्या व्यक्तीला उत्तर देणे गरजेचे आहे. जे व्यक्ती सतत तुमचा अपमान करतात त्या व्यक्तींचे सहन करत राहिल्यामुळे त्या व्यक्तीची हिंमत जास्त वाढते. आणि जास्त लोकांमध्ये देखील तुमचा अपमान होऊ शकतो. म्हणून विनाकारण केलेला अपमान कधीच सहन करू नये. अपमान सहन करणे हे देखील अपमान करण्यासारखेच चुकीची आहे.

अपमान करणाऱ्या व्यक्तीला तिथेच थांबवा

आचार्य चाणक्य सांगतात, अपमान सहन करणारे व्यक्ती समाजामध्ये कधीच त्यांचे स्थान मिळवू शकत नाही. एखाद्या व्यक्ती सतत अपमान करत असेल तर त्यासोबतच दुसरे व्यक्ती देखील आपला अपमान करू शकतात. त्याचबरोबर एखादा व्यक्ती  कोणाचा अपमान करत असेल तर दुसरे व्यक्ती देखील त्या अपमान सहन करणाऱ्याला नापसंत करतात. त्यामुळे एखादा व्यक्ती तुमचा अपमान करत असेल तर त्याला त्याच ठिकाणी थांबवणे गरजेचे आहे. आणि अशा व्यक्तींपासून दूर राहणे देखील गरजेचे आहे.