Chanakya Niti : जगातील ‘या’ 4 गोष्टी आहेत अतिशय मौल्यवान

टाइम्स मराठी । आचार्य चाणक्य हे प्राचीन भारतीय राजनीती शास्त्रज्ञ असून चाणक्य म्हणून त्यांची सर्वत्र ओळख आहे. आचार्य चाणक्य  यांनी जीवनात बऱ्याच  वाईट गोष्टींचा सामना करत आयुष्य  चांगल्या प्रकारे जगले आहे. आचार्य चाणक्य यांनी बऱ्याच प्रकारचे लेखन केले असून त्यांच्या संग्रह पैकी एक म्हणजे नीतीशास्त्र. चाणक्यनीती मध्ये (Chanakya Niti) आचार्य चाणक्य यांनी आयुष्य कस जगावं इथपासून ते जीवनात काय करावं? कस राहावं याबाबत मार्गदर्शन केलं आहे.आचार्य चाणक्य यांच्यामध्ये, मौल्यवान  वस्तूंमध्ये  कधीही सोनं, हिरे, मोती यांचा उल्लेख होत नाही. जगामध्ये अशा चार मौल्यवान वस्तू आहेत, ज्यामुळे सर्वसामान्य माणसांना  सुख समृद्धी लाभेल. या चार मौल्यवान गोष्टींपेक्षा दुसरं काहीच मौल्यवान नाही, असं चाणक्य नीति सांगते. जाणून घेऊया या चार मौल्यवान  गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत.

   

१) दान-

आचार्य चाणक्य यांच्यामते (Chanakya Niti) दाना शिवाय कोणतीच मौल्यवान गोष्ट या जगात नाही. एखाद्या गरिबाला अन्न पाणी किंवा वस्त्र दान करणे हे सर्वात मोठे दान मानले जाते. जगात बरेच व्यक्ती अन्न वस्त्र दान करत असतात. यामुळे त्यांच्या आत्म्याला पुण्य लाभते. कधीही व्यक्तीने भ्रमण केले नाही तरी चालेल परंतु व्यक्तीने डोनेशन किंवा दान करणे गरजेचे आहे.

२) एकादशी– Chanakya Niti

आचार्य चाणक्य यांच्यामते एकादशी ही सर्वात पवित्र अशी तिथी आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने एकादशी धरली पाहिजे. ज्यामुळे विष्णू देव प्रसन्न होतील. कारण विष्णू देवाला एकादशी तिथी प्रिय असते. आणि यापेक्षा मौल्यवान वस्तू कोणतीच नाही असे चाणक्य म्हणतात.

३) गायत्री मंत्र

जगातील सर्वात शक्तिशाली मंत्र म्हणून गायत्री मंत्राकडे पाहिले जाते. देवी गायत्रीला वेद माता म्हटलं जातं. गायत्री देवी मुळे चारही वेदांची निर्मिती झाली आहे. त्यानुसार गायत्री मंत्राचा जप करणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्या सर्वांना गायत्री मंत्र माहितीच असेल.  या गायत्री मंत्रापेक्षा मौल्यवान वस्तू कोणतीच नाही. असं चाणक्य म्हणतात. गायत्री मंत्र मध्ये असलेली शक्ती आपल्यावर प्रभाव पाडत असते.

४) आई

जगातील सर्वात शेवटची आणि मौल्यवान गोष्ट म्हणजे आई. धरतीवर आई पेक्षा श्रेष्ठ आणि मोठं कोणीच नाही. त्याचबरोबर आई पेक्षा कोणता देव, तीर्थ, गुरु हा मोठा नसतो. त्यामुळे रोज सकाळी उठून आईचे दर्शन घ्यायला पाहिजे. आईचा आशीर्वाद तुमच्यावर असेल तर तुम्हाला कोणीच हरवू शकत नाही. त्यामुळे आई पेक्षा मौल्यवान गोष्ट जगात कोणतीच नसल्याचे आचार्य चाणक्य म्हणतात.