Chanakya Niti : ही आहे महिलांची सर्वात मोठी ताकद; कोणालाही करू शकतात मंत्रमुग्ध

टाइम्स मराठी । आचार्य चाणक्य यांचे नीतिशास्त्र (Chanakya Niti) हा संग्रह प्रचंड  प्रसिद्ध आहे. या संग्रहाच्या माध्यमातून आचार्य चाणक्य यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठीच्या काही नीती सांगितल्या आहेत. आचार्य चाणक्य हे जीवनात येणाऱ्या संकटावर कशा पद्धतीने मात केली पाहिजे याबाबत भाष्य करतात. एवढेच नाही तर  वैवाहिक जीवन, घरात सुख समृद्धी लाभावी यासाठी करण्यात येणाऱ्या उपायांवर देखील भाष्य करतात. आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या नीती ह्या प्रत्येक व्यक्तीने आचरणात आणणे गरजेचे आहे. जेणेकरून  जीवनात येणाऱ्या संकटांचा सामना करता येईल.

   

आचार्य चाणक्य यांनी, चाणक्य नीति मध्ये महिलांच्या ताकती बद्दल भाष्य केले आहे. त्यांच्या मते  महिलाही काहीही करू शकतात . राजा, ब्राह्मण आणि महिलांच्या ताकतीबाबत आचार्य चाणक्य सांगतात. आचार्य चाणक्य यांनी महिलांच्या सौंदर्याचे वर्णन केले आहे. चाणक्य यांच्या मते महिलांचे सौंदर्य ही त्यांची सर्वात मोठी ताकद असते. यासोबतच आचार्य चाणक्य राजाची ताकद ही बाहुबल असते हे सांगितलं , तर ब्राह्मणांची ताकद म्हणजे ज्ञान आणि विद्या आहे असं आचार्य चाणक्य म्हणतात.

महिलांच्या वाणीमध्ये असतो गोडवा- Chanakya Niti

महिलांची गोड आणि मधुर वाणी ही सर्वात मोठी ताकद असते. महिला त्यांच्या मधुर आवाजाने आणि सौंदर्याने कोणालाही मंत्रमुग्ध करू शकतात. महिलांच्या मधून वाणीतून कोणतेही काम सहजतेने होते. जे काम पुरुषांना करण्यासाठी वेळ जातो ते महिलांच्या मधुर वाणीतून लगेच पूर्ण होते. यासाठी महिलांना जास्त वेळ वाया घालवावा लागत नाही. महिलांच्या वाणीमध्ये एक गोडवा असतो.

सौंदर्य ही महिलांची दुसरी शक्ती

सौंदर्य ही महिलांची दुसरी मोठी शक्ती असल्याचं आचार्य चाणक्य (Chanakya Niti) सांगतात. परंतु स्त्रीच्या बोलण्यातला गोडवा हा शारीरिक सौंदर्य पेक्षा जास्त महत्त्वाचा असतो. शारीरिक सौंदर्य पेक्षा महिलांच्या आवाजाने एखादा व्यक्ती तिचा चाहता बनू शकतो. या ताकतीच्या जोरावर महिला घरात असो किंवा बाहेर सर्वांची प्रशंसा मिळवू शकते. यासोबतच कुटुंबाचे मन देखील वाणीतून महिलांना जिंकता येते.