Chanakya Niti : कधीही सुखी राहू शकत नाहीत ‘या’ 3 व्यक्ती; आयुष्यात नेहमी झेलावं लागतं दुःख

टाइम्स मराठी । आचार्य चाणक्य यांच्या चाणक्यनीतीच्या (Chanakya Niti) माध्यमातून आपल्याला सुख दुख, यश अपयश, मित्र शत्रू, पती-पत्नी  यासारख्या बऱ्याच गोष्टी बद्दल माहिती देत असते. आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या काही नीती आचरणात आणल्या की  जीवन कसे जगायचे हे समजते. आचार्य चाणक्य यांची नीती  जीवनात वेगवेगळ्या समस्यांवर कशा पद्धतीने मात करणे गरजेचे आहे यावर भाष्य करते. त्यांनी सांगितलेल्या निती आयुष्यात प्रत्येक वळणावर कामात येतात. आचार्य चाणक्य यांची चाणक्य नीति ही लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांसाठी गरजेची आहे.

   

आचार्य चाणक्य यांच्या मते, जीवनामध्ये  चढ उतार येतच असतात. बऱ्याचदा काही मोठे संकटे येतात परंतु त्या संकटांचा सामना करणे गरजेचे असते. काही व्यक्ती हे खूप सौभाग्यशाली असतात असे व्यक्ती सतत सुखी राहतात. परंतु काही लोकांच्या जीवनामध्ये संकट पाठ सोडत नाही. त्यानुसार आचार्य चाणक्य यांनी केलेल्या सुखदुःखा बद्दलची नीती आपण पाहणार आहोत. आचार्य चाणक्य यांनी आजच्या चाणक्य नीति मध्ये  जगात असलेल्या  तीन अशा व्यक्तींबद्दल सांगितले आहे जे सतत दुखी राहतात. परंतु त्यांच्या दुखी राहण्यामागे काही कारणे आहे. चाणक्य नीति नुसार, (Chanakya Niti) जगात तीन प्रकारचे व्यक्ती असतात. जे की सतत दुखी राहतात. अशा व्यक्तींकडे भरपूर संपत्ती असली तरी देखील ते दुःखाचे निवारण करू शकत नाही. अशा व्यक्तींच्या दुःखाचे कारण हे त्यांचे जवळचे नातेवाईक असतात. अशा व्यक्तींना आयुष्यामध्ये सुख मिळत नाही.

1) अशा मुलांमुळे आई-वडिलांना राहावे लागते दुःखी

ज्या आई-वडिलांचा मुलगा चांगले संस्कार देऊन देखील वाईट मार्गाला जात असेल, गैर जिम्मेदार नालायक असंच कार्य असेल तर ते आई वडील कधीच खुश राहू शकत नाही. अशा आई-वडिलांचे जीवन सतत विचारात आणि दुःखामध्ये कटते. अशा मुलांमुळे समाजामध्ये त्यांची बदनामी होते. आणि वृद्धापकाळात  त्यांना कोणी आधार देत नाही. यामुळे आई-वडील सतत  दुःखात असतात. ते कधी सुखी राहू शकत नाही.

2) वडिलांवर असलेले कर्ज- Chanakya Niti

आयुष्यात सुख दुःख येतच असतात. परंतु ज्या मुलाच्या वडिलांवर कर्ज असेल त्यांच्यावर येणारे दुःख हे कधी संपत नाही. आणि वडिलांसोबतच मुलाला देखील सतत दुःख झेलावे लागते. वडिलांमुळे मुलालाच हे कर्ज फेडावे लागते. त्याचबरोबर वडिलांवर असलेले कर्ज फेडण्यासाठी मुलाला करिअर करता येत नाही. यामुळे मुलगा कधीच आयुष्यात पुढे जात नाही. आणि मुलगा यामुळे कधी सुखी राहत नाही. त्यांच्या आयुष्यात सतत दुःखच येत असते.

3) आई आणि पत्नीची वाईट वागणूक

आयुष्यातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे आई आणि पत्नी असते. आईने जन्म दिलेला असतो आणि पत्नी ही आयुष्यभराची साथी असते. जर आई किंवा पत्नी दोन्हीपैकी एक वाईट वागत असेल तर समाजामध्ये बदनामी होते. ज्या व्यक्तीची आई किंवा पत्नी वाईट वागत असेल तर त्या व्यक्तीला देखील समाजामध्ये  बदनामी सहन करावी लागते. असे व्यक्ती कधीच जीवनात ताठ मानेने जगू शकत नाही. आणि कधीच खुश राहत नाही.