Chanakya Niti : चाणक्यांच्या मते मूर्ख असतात समाजातील ‘ही’ लोक; कधीच मिळत नाही मान- सन्मान

टाइम्स मराठी । मोठ्यांपासून छोट्यापर्यंत सर्वजण चानक्य निती (Chanakya Niti) चे पालन करताना दिसतात. आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांनी केलेल्या लिखाणामध्ये वेगवेगळे संग्रह उपलब्ध आहे. त्यापैकी नीतीशास्त्र हे आपल्या सर्वांना माहिती असेल. नीतीशास्त्रामध्ये आचार्य चाणक्य यांनी यशस्वी होण्यापासून जीवन कसे जगावे हे देखील सांगितले आहे. एवढेच नाही तर करियर संबंधित देखील बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितले आहेत.

   

आचार्य चाणक्य यांना बऱ्याच विषयांची माहिती होती. त्यांना जीवनात मिळालेल्या बऱ्याच अनुभवातून जीवन कशा पद्धतीने जगले पाहिजे हे देखील आचार्य चाणक्य सांगतात. आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या काही धोरणांचे पालन केल्यावर तुमची कधीच फसवणूक होणार नाही. आचार्य चाणक्य म्हणतात की जगात असे अनेक लोक आहेत जे स्वतःला बुद्धिमान समजतात. परंतु त्यांना समाजात कोणीही किंमत देत नाही.

कोणतेही काम करण्यापूर्वी विचार करणे गरजेचे

चाणक्य नीति नुसार, प्रत्येक काम हे विचार करूनच केले पाहिजे. जे व्यक्ती सर्व बाजूंनी विचार करून काम करतात ते नक्कीच यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. परंतु कोणताच विचार न करता एखादा व्यक्ती काम करत असतील तर त्यांना अपयश मिळते. समाजामध्ये अशा व्यक्तींना मूर्ख म्हटले जाते. त्यानुसार कोणतेही काम करत असताना त्यातून होणारा फायदा आणि नुकसान दोन्हीही आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे.

स्वतःची प्रशंसा करणे मूर्खपणाचे

आचार्य चाणक्य यांच्यानुसार, समाजामध्ये स्वतः चे कौतुक करणारे बरेच लोक असतात. हे लोक दुसऱ्या व्यक्तींसमोर स्वतःची हुशारकी सांगतात. अशा व्यक्तींना समाजात मूर्ख म्हटले जाते. जे व्यक्ती स्वतः चे कौतुक करतात त्यांना समाजामध्ये मानसन्मान दिला जात नाही. जर तुमच्यामध्ये चांगले गुण असतील तर लोक स्वतः कौतुक करतील. त्यासाठी तुम्हाला तुमची स्वतःचे कौतुक करायची गरज नाही.

स्वतःला बुद्धिमान समजणे अयोग्य

चाणक्य म्हणतात, समाजामध्ये असे बरेच व्यक्ती आहेत, जे स्वतःला हुशार, बुद्धिमान समजतात. परंतु ते स्वतः मूर्ख पेक्षा कमी नाही. बुद्धिमान व्यक्ती कधीच स्वतःच्या बोलीतून तो बुद्धिमान आहे असे दर्शवत नाही. बुद्धिमान व्यक्तींचा स्वभाव हा पूर्णपणे शांत असतो. जे व्यक्ती स्वतःला बुद्धिमान समजतात त्याचा सर्वनाश झाल्याशिवाय राहत नाही. त्याचबरोबर अशा व्यक्तींना समाजामध्ये मान सन्मान दिला जात नाही.

प्रत्येक पावलावर दुसऱ्यांचा अपमान करणे

जे व्यक्ती दुसऱ्यांचा अपमान करतात, ते व्यक्ती समाजात सन्मानांच्या लायक नसतात. दुसऱ्या व्यक्तींचा अपमान करणे म्हणजेच स्वत:चा अपमान करणे होय. अशी व्यक्तीही मूर्खच असते असं चाणक्य म्हणतात.