टाइम्स मराठी । आचार्य चाणक्य म्हणजे विष्णुगुप्त शिरोमणी. ते प्राचीन भारतीय राजनीती शास्त्रज्ञ असून चाणक्य म्हणून त्यांची सर्वत्र ओळख आहे. आचार्य चाणक्य यांनी बऱ्याच प्रकारचे लेखन केले असून आपल्या चाणक्यनीतीच्या माध्यमातून त्यांनी मनुष्याला उपयुक्त असे काही सल्ले दिले आहेत. आचार्य चाणक्य यांनी चाणक्यनीती (Chanakya Nit) मध्ये कुटुंब, वैवाहिक जीवन, माता पिता, संतान यांच्याबाबत देखील काही नीती सांगितल्या आहेत. चाणक्य यांच्या मते यशस्वी होण्यासाठी फक्त पैसा, सोने हे गरजेचे नसते. पैशांशिवाय समाधान सुख समृद्धी शांती असणे देखील आयुष्यात गरजेचे असते. एखाद्या व्यक्तीकडे पैसा असेल तर त्यांच्याकडे सुख समृद्धी शांती नसते. त्यांना या तीनही गोष्टी कधीच लाभत नाही. आणि पैशांच्या मागे फिरणारा व्यक्ती कधी समाधानी राहू शकत नाही. पैशांशिवाय सुख समृद्धी शांती समाधान लाभणे हे अत्यंत गरजेचे आहे. या बाकीच्या गोष्टींची देखील आयुष्यात अत्यंत गरज पडत असते. त्यानुसार आपण आज आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या पैसा शिवाय गरजेच्या असलेल्या गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत.
पैशांच्या मागे फिरणे टाळा– Chanakya Nit
आचार्य चाणक्य यांच्या मते, पैशांच्या मागे फिरणाऱ्यांना कधीच सुख शांती मिळत नाही. उलट पैशांच्या मागे फिरणाऱ्यांना प्रत्येक वेळेस समस्यांचा सामना करावा लागतो. यामुळे त्यांचे वैयक्तिक आयुष्य उध्वस्त होताना दिसते. म्हणून आज कधीही पैशांच्या मागे पडू नका. पैसा कमावण्यासाठी मेहनत घ्या. मेहनतीने कमावलेला पैसा कधीही कामात येतो. परंतु सतत पैशाच्या मागे फिरल्यामुळे बऱ्याच समस्या देखील आपल्या मागे लागतात.
समाधानी व्यक्ति कधीच पैशांच्या मागे धावत नाही
समाधानी व्यक्ति कधीच पैसे किंवा दुसऱ्या कोणत्या गोष्टीच्या मागे धावत नाही. समाधानी व्यक्ती कधीही कोणतीही गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. अशा व्यक्तींकडे पैसे नसले तरी देखील ते समाधानी राहतात. या व्यक्तींना कधीच अडचणींचा सामना करावा लागत नाही. ते त्यांचे जीवन कोणत्याही परिस्थितीमध्ये आनंदाने जगत असतात. आचार्य चाणक्य (Chanakya Nit) यांच्यानुसार समाधानी व्यक्तींना पैशांची गरज कधीच भासत नाही. कारण हे व्यक्ती कोणत्याही गोष्टींमध्ये समाधान शोधत असतात आणि खुश राहत असतात.