Chanakya Niti : पार्टनरसोबत भांडण झालंय? चाणक्यांच्या ‘या’ टिप्स वापरून घालवा राग

टाइम्स मराठी । आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीति या लिखित संग्रहातून बरेच अनुभव सादर केले आहेत. प्रत्येक व्यक्तीला चाणक्यनीतीचा उपयोग होतो. लहानांपासून ते जेष्ठ व्यक्तींपर्यंत सर्वजण चाणक्यनीती चे पालन करतात. आचार्य चाणक्य जीवनसाथी कसा असावा, जीवन कसे जगावे, यशस्वी कसं व्हावं यासारख्या बऱ्याच टिप्स माणसाला दिल्या आहेत. अनेकदा नवरा बायकोमध्ये किंवा दोन प्रेमी युगुलामध्ये भांडण तंटा होतच असतो. पण भांडण जास्त ताणून ठेवले तर ते भांडण टोकाला जाण्याचा जास्त धोका असतो. आणि भांडणामुळे नात्यांमध्ये दुरावा देखील निर्माण होतो. अशावेळी जोडीदाराचा राग, रुसवा फुगवा योग्य पद्धतीने आणि योग्य वेळेमध्ये दूर गेला नाही तर वाद जास्त वाढतो. अशावेळी आपल्या जोडीराचा राग कसा घालवावा यासाठी आचार्य चाणक्य यांनी काही टिप्स दिल्या आहेत. त्याचे पालन केल्यास, तुम्हीही तुमच्या पार्टनरचा रुसवा घालवू शकता.

   

1) एकमेकांसोबत वेळ घालवणे गरजेचे

बऱ्याच नात्यांमध्ये जोडीदाराला वेळ न दिल्यामुळे दुरावा निर्माण होतो. त्यामुळे भांडण देखील होतात. बऱ्याचदा नात्यातील एखादा व्यक्ती वेळ देत नाही म्हणून तक्रार करत असतो. परंतु समोरचा व्यक्ती समजून न घेता भांडण सुरू करतो. त्यामुळे नाद तुटण्याची जास्त शक्यता असते. अशावेळी जोडीदाराला वेळ देणे अत्यंत गरजेचे आहे. तुम्ही जोडीदारासोबत सुट्टी एन्जॉय करण्यासाठी, लॉंग ड्राइव्ह वर जाऊ शकतात. ज्यामुळे तुम्हाला एकांतात वेळ घालवता येईल. जेणेकरून एकमेकांना समजून घेऊन तुमच्यातील दुरावा कमी होईल आणि प्रेम वाढेल.

2) जोडीदाराच्या चेहऱ्यावर हसू आणा

नातं टिकवून ठेवण्यासाठी जोडीदाराला हसतमुख ठेवणे देखील गरजेचे आहे. त्यामुळे त्यांचा दिवसही चांगला जाईल आणि तुम्हाला देखील आनंद मिळेल. त्याचबरोबर तुमच्या नात्यांमध्ये उत्साह टिकून ठेवण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टींमधून जोडीदाराच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न केला तर नातं आणखीनच फुलू शकते. बऱ्याच वेळेस आपण एखादी गोष्ट आवडली असली तरी प्रशंसा करत नाही. परंतु त्यांची प्रशंसा केल्यामुळे त्यांना देखील चांगलं वाटेल.

3) जोडीदाराला सरप्राईज गिफ्ट द्या

बऱ्याच महिलांना सरप्राईज गिफ्ट प्रचंड आवडत असते. त्याचबरोबर गिफ्ट हा तुमच्या भावना व्यक्त करण्याचा चांगला मार्ग आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्याही स्पेशल दिवसांची वाट न पाहता वेळोवेळी तुमच्या जीवनसाथीला सरप्राईज गिफ्ट देऊ शकतात. जेणेकरून तुमचा पार्टनर तुमच्यावर खुश होईल आणि तुमच्या नात्यांमध्ये प्रेम वाढेल.