Chanakya Niti : वैवाहिक जीवनामध्ये यश मिळवण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स

टाइम्स मराठी । आचार्य चाणक्य यांच्याबद्दल तर तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. आचार्य चाणक्य यांनी आपल्या लिखाणामध्ये वेगवेगळे संग्रह लिहिले आहेत. यातील चाणक्य नीती (Chanakya Niti) मध्ये त्यांनी यशस्वी होण्याच्या नीतीपासून जीवन कसे जगावे हे देखील सांगितलं आहे. तसेच जीवन जगत असताना काय करावं? कोणत्या गोष्टी टाळाव्या याबाबत त्यांनी मार्गदर्शन केलं आहे. आचार्य चाणक्य यांच्या मते,  वैवाहिक जीवनामध्ये सुख समृद्धी लाभावी यासाठी बऱ्याच गोष्टींचे पालन करणे गरजेचे असते. यासोबतच आज-काल अरेंज मॅरेज पेक्षा लव मॅरेज करणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. परंतु लव मॅरेज मध्ये मोठ्या प्रमाणात भांडण होत असतात. आचार्य चाणक्य यांनी वैवाहिक जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी काही नीती सांगितल्या आहेत. त्याचे पालन केल्यास नक्कीच तुम्हाला यश मिळेल.

   

ईमानदार असणे गरजेचे

जर तुम्ही तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये यशस्वी होऊ इच्छित असाल तर तुम्ही ईमानदार असणे (Chanakya Niti) अत्यंत गरजेचे आहे. तुम्ही तुमच्या बायकोसोबत अतिशय प्रामाणिक असायला हवं. तुम्ही कधीही तुमच्या पत्नीसोबत खोटं बोलू नका. नात्यांमध्ये  विश्वासार्हता आणि इमानदारी असणे गरजेचे आहे, कारण एकदा तुमचं खोटं पकडलं गेलं तर तुमच्या साथीदाराचा तुमच्यावरील विश्वास उडण्याची शक्यता असते. तसेच एकमेकांवर प्रेम असलेले व्यक्ती कधी दुसऱ्या व्यक्तीकडे आकर्षित होत नसतात. अशा व्यक्तींना प्रेमामध्ये यश नक्की मिळतं.

महिलांचा सन्मान करणे गरजेचे– Chanakya Niti

तुम्ही तुमच्या प्रेमामध्ये किंवा वैवाहिक जीवनामध्ये महिलांचा सन्मान करत असाल तर ते प्रेम दृढ होत जातं. कारण प्रत्येक महिलेला तिच्या साथीदाराने आपला सन्मान करायला हवा असं वाटत असतं. यामुळे नातं घट्ट होतं आणि तो व्यक्ती गुणवान असल्याचे मानले देखील जाते. प्रत्येक व्यक्तीमध्ये आपल्या पार्टनर ची रक्षा करण्याचे गुण असले पाहिज.  एखादी महिला जर कोणत्या अडचणींमध्ये असेल तर त्या अडचणी मधून बाहेर काढण्याचा प्रयत्न तिच्या नवऱ्याने करायला हवा. असे व्यक्ती वैवाहिक जीवनामध्ये मध्ये यशस्वी होतात.