टाइम्स मराठी । आचार्य चाणक्य (Chanakya Niti) यांच्याबद्दल तर आपण नक्कीच ऐकलं असेल किंवा वाचलं असेल. चाणक्यांनी आपल्या चाणक्यनीती मध्ये मनुष्याला जीवनासंबधी अनेक मार्गदर्शक सल्ले दिले आहेत. आयुष्य कस जगावे? सुखी जीवनसाथी काय करावं? आयुष्यात यशस्वी होण्यासाठी कोणते प्रयत्न करावे याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे. आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या नीती ह्या प्रत्येक व्यक्तीने पाळल्यास त्यांचं आयुष्य आनंददायी आणि सुखदायी होईल.
आचार्य चाणक्य (Chanakya Niti) यांच्या मते, प्रत्येक व्यक्तीला चरित्राने नाही तर कर्माने महान समजले जाते. यासोबतच मानवाचे कर्म हेच त्यांची दशा आणि दिशा ठरवतात. यासोबतच चांगल्या आणि वाईट कर्मांचे फळ हे फक्त वर्तमानात नाही तर पुढच्या जन्मी देखील मिळत असते. आचारी चाणक्य आणि अशा काही गोष्टींबाबत सांगितले आहे, ज्या गोष्टी तपस्या करून देखील मिळत नाही. परंतु जो व्यक्ती या गोष्टी प्राप्त करतो, तो भाग्यशाली मानला जातो. त्यानुसार जाणून घेऊया या कोणत्या चार गोष्टी आहेत.
१) बुद्धिमान जीवनसाथी- (ChanakyaNiti)
आयुष्यात चांगला जीवनसाथी मिळणे हे भाग्यावर अवलंबून असते. त्यानुसार आयुष्यामध्ये बुद्धिमान आणि गुणी जीवनसाथी मिळायला भाग्य लागते. चांगला जीवनसाथी मिळण्याचे सुख प्रत्येकाला मिळत नाही. हे सुख मागच्या जन्मी चांगले कर्म केलेल्या व्यक्तीलाच मिळते. आचार्य चाणक्य यांच्या मते जे व्यक्ती स्त्रीचा मान सन्मान करतात, त्यांच्या सुख दुःखामध्ये त्यांना साथ देतात अशा व्यक्तींना जन्मभर पुण्याचे फळ मिळते.
२) पैशांचा योग्य वापर-
पैसा हा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये महत्त्वाचा भाग आहे. आज काल पैसा असेल तर मानसन्मान दिला जातो. पैशाशिवाय या जगामध्ये काहीच होऊ शकत नाही. यासोबतच पैशाचे योग्य नियोजन करणे देखील अत्यंत गरजेचे आहे. जे व्यक्ती पैशांचे योग्य नियोजन करत, वायफळ खर्च टाळतात असे व्यक्ती कधीच कोणासमोर पैशांसाठी हात जोडत नाही. पैशांचे नियोजन करण्याचा गुण हा प्रत्येक व्यक्तीमध्ये नसतो. जे व्यक्ती कधीच लक्ष्मीचा अनादर करत नाही अशा व्यक्तींकडे पैसा खेळून राहतो. त्यामुळे कधीही पैशाचा उपयोग योग्य ठिकाणीच करणे गरजेचे आहे.
३) दान करणे
दान करणे हे पुण्याचे काम समजले जाते. आचार्य चाणक्य यांच्या मते जे व्यक्ती दान करण्याची भावना ठेवतात ते व्यक्ती त्यांच्या आयुष्यात प्रगती करतात. अशा व्यक्तींना प्रत्येक वेळेस त्यांचे नशीब साथ देत असते. त्यामुळे कधीही दान करण्याची भावना ठेवा. दान केल्यामुळे व्यक्तीच्या आयुष्यामध्ये भरभराट होते.