99 रुपयांमध्ये थेटरमध्ये जाऊन चित्रपट पाहण्याची संधी; असं करा बुकिंग

टाइम्स मराठी । थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहणे प्रत्येकालाच आवडत असते. त्यानुसार काही व्यक्ती चित्रपट रिलीज झाल्यास फर्स्ट शो चित्रपट पाहायला जातात. मग त्या तिकिटाची किंमत कितीही असो. त्यांचा टायची फिकीर नसतेच. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका ऑफर बद्दल सांगणार आहोत ज्या माध्यमातून तुम्ही फक्त 99 रुपयांमध्ये थेटरमध्ये जाऊन चित्रपट पाहू शकता. घाई करा कारण ही ऑफर फक्त उद्या पुरती मर्यादित आहे.

   

उद्या काय खास आहे?

13 ऑक्टोबरला म्हणजेच उद्या संपूर्ण भारतामध्ये 99 रुपयांमध्ये नवीन चिंत्रपट पाहण्याचा आनंद ग्राहक घेऊ शकतात. कारण संपूर्ण भारतामध्ये उद्या नॅशनल सिनेमा डे साजरा केला जातो. या दिवशी स्वस्तामध्ये सिनेमा हॉलमध्ये चित्रपट दाखवले जातात. त्यानुसार आता भारतातील ४ हजार सिनेमा हॉलमध्ये लोकांना स्वस्तात सिनेमा पाहता येणार आहे. मागच्या वर्षी या नॅशनल सिनेमा डे ला 65 लाख लोकांनी थेटर मध्ये जाऊन मूव्हीज पाहिल्या होत्या. आणि नवीन रेकॉर्ड बनवला होता.  ता याही वर्षी 65 लाख पेक्षा जास्त लोक सिनेमा थेटर मध्ये येऊन सिनेमा पाहतील अशी आशा आहे. आणि हा रेकॉर्ड ब्रेक होईल.

अशा पद्धतीने करा ऑनलाईन तिकीट बुक

तुम्ही देखील 99 रुपयांमध्ये मूव्हीज पाहण्याची संधी गमावणार नसाल तर तुम्ही ऑनलाईन BookMyShow च्या माध्यमातून तिकीट बुक करू शकता. त्यासाठी PayTm वरून पे करून तुम्ही ऑनलाईन तिकीट मिळवू शकतात. त्यासाठी तुम्हाला PayTm वर गेल्यानंतर तुम्हाला ज्या सिनेमा हॉलमध्ये मूव्हीज बघायची आहे त्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या ऑप्शन पैकी सीट्स बुक करू शकतात. आणि त्यानंतर पेमेंट करू शकता.

कोण कोणत्या थेटर मध्ये आहे ऑफर?

99 रुपयांमध्ये मूव्हीज पाहण्यासाठी देशातील प्रसिद्ध सिनेमा हॉल मध्ये तुम्ही जाऊ शकतात. त्यानुसार PVR, INOX, Cinepolis, Miraj, City Pride, Asian, Mukta A2, movie time, wave, M2k, यासारख्या सिनेमा हॉलमध्ये जाऊन तुम्ही 99 रुपयांमध्ये चित्रपटाचा आनंद घेऊ शकता. तुम्ही ज्या सिनेमा हॉलमध्ये जाणार आहात त्या सिनेमा हॉलच्या चार्जनुसार आणि लोकेशन नुसार किंमत चेंज होऊ शकते.