Chandrayaan 3 : अंतराळातील कक्षेत असे फिरत आहे चंद्रयान-3; Video आला समोर

टाइम्स मराठी | गेल्या १४ जुलै रोजी चंद्रयान-३ (Chandrayaan 3) लॉन्च करण्यात आले आहे. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन केंद्रावरून चंद्रयान-३ चे LMV-3 रॉकेट चंद्रावर प्रक्षेपण करण्यात आले. चंद्रयान-३ चे रॉकेट पृथ्वीवरून उड्डाण केले तेव्हा त्याची उंची सुमारे ४३.५ मीटर होती. चंद्रयान-३ त्याच्या कक्षेत जात असताना हे रॉकेट वेगळे झाले होते. फक्त चंद्रयान-३ आणि त्याचे प्रोपल्शन मॉड्यूल शिल्लक होते. आज तेच लंबवर्तुळाकार कक्षेत पृथ्वीभोवती फिरताना दिसत आहे.

   

इटलीतील मॅन्सियानो येथील व्हर्च्युअल टेलिस्कोप प्रकल्पाने घेतलेल्या फोटोंमध्ये चंद्रयान-३ (Chandrayaan 3) ताऱ्यांमधून वेगाने बाहेर पडताना दिसत आहे. याचा लॅप्स व्हिडिओ देखील बनवण्यात आला आहे. C14+Paramount ME+Sbig ST8-XME रोबोटिक युनिटने ही छायाचित्रे १५ ते १७ जुलै दरम्यान घेतली आहेत. यावेळी चंद्रयान-३ चे इंजिन दुसऱ्या दिशेला होते. किंवा ते बंद पडले होते. कारण ते ज्या वेगाने ते जात होते त्यावेळी इंजिन चालू असल्याचे संकेत दिसले असते.

मुख्य म्हणजे, ज्यावेळी ही छायाचित्रे घेण्यात आली तेव्हा चंद्रयान -३ (Chandrayaan 3) किमान ४१ हजार किलोमीटरहून अधिक अंतरावर अंतराळात फिरत होते. तेव्हापासून त्याची कक्षा बदलली आहे. १४ जुलै रोजी चंद्रयान-३ प्रक्षेपित केल्यानंतर १५ जुलै रोजी प्रथम कक्षीय युक्ती चालविली गेली. त्यानंतर त्याचे अंतर ३१,६०५ वरून ४१,६०४ किमी करण्यात आले होते. यादरम्यानच ही छायाचित्रे घेण्यात आली आहेत.

यान २२८ X ५१४०० किमीच्या कक्षेत फिरत आहे- (Chandrayaan 3)

आता ते १७३ किमीवरून २२६ किमी करण्यात आले आहे. आता यान २२८ X ५१४०० किमीच्या कक्षेत फिरत आहे. दरम्यान चंद्रयान-३ आपल्या ठरलेल्या वेळापत्रकानुसारच सुरु असल्याची माहिती इस्त्रोच्या प्रमुखांनी दिली आहे. चंद्रयान-३ सुरक्षित आहे. त्याच्या सर्व कक्षीय युक्ती इस्रो केंद्रामधून केल्या जात आहेत.

तसेच आता यानाची कक्षा बघता विक्रम लँडरच्या चारही चाकांची ताकद वाढवण्यात आली आहे. तसेच नवीन सेन्सर आणि नवीन सोलर पॅनल बसवण्यात आले आहे. मागील वेळी चंद्रयान-२ च्या लँडिंग साइटचे क्षेत्रफळ ५०० मीटर निवडले होते. यावेळी इस्रोला विक्रम लँडर मध्यभागी उतरवायचे आहे. त्यामुळे लँडिंगचे क्षेत्रफळ ४ किमी x २.५ किमी ठेवण्यात आले आहे. म्हणजेच चंद्रयान-३ चे विक्रम लँडर सुरक्षितपणे चंद्रावर उतरू शकते.