चांद्रयानाचे दोन्ही इंजिन बंद पडले तरीही….; ISRO प्रमुख नेमकं काय म्हणाले?

टाइम्स मराठी | सध्या भारताची चंद्रयान 3 (Chandrayaan 3) मोहीम सुरू आहे. 23 ऑगस्टला चांद्रयान चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणार आहे. सध्या हे चंद्रयान चंद्राच्या कक्षेमध्ये भ्रमण करत असून काही दिवसातच ही मोहीम अंतिम वळणावर पोहोचेल. सर्वांचे चांद्रयानाच्या सॉफ्ट लँडिंग कडे लक्ष लागून आहे. त्याचबरोबर नागरिक चांद्रयानाच्या प्रत्येक बातम्या वर लक्ष ठेवत असतानाच आता इस्त्रो प्रमुखांनी अस एक सूचक वक्तव्य केले आहे. ज्यामुळे संपूर्ण जगाच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या आहे.

   

दिशा भारत या स्वयंसेवी संस्थेमार्फत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात इस्रोचे प्रमुख पदी असलेले एस सोमनाथ भारताच्या चांगल्या मोहिमेबद्दल संवाद साधत असताना म्हणाले की, चांद्रयानाचे दोन्ही इंजिन बंद पडले तरीही 23 ऑगस्टला चंद्रावर उतरेल. ते म्हणाले की लँडरची आखणी अशा प्रकारे केली आहे की अपयश आले तरीही ही मोहीम यशस्वीपणे पूर्ण होऊ शकते.

एस सोमनाथ म्हणाले की, सर्व बाबतींमध्ये अपयश आले, सेन्सर बंद पडले, किंवा काहीही सुरू राहिलं नाही तरीही विक्रम लँडर चंद्रावर यशस्वीपणे लँडिंग करेल. त्याला खास पद्धतीने तयार करण्यात आला आहे. कितीही अडचणी आल्या आव्हान आली तरीही या सर्वांवर मात करण्याच्या अनुषंगाने इस्त्रोंकडून विक्रम लँडर तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितलं. या ठिकाणी सर्वात मोठं काम असेल ते म्हणजे आडव्या दिशेने असणाऱ्या विक्रमला उभ करणे, चंद्रावर त्यांचं लँडिंग करणे. जर लॅन्डर ओर्बीटर पासून वेगळा झाला तर तो आडव्या दिशेमध्ये येईल. यामुळे manueuvres या दरम्यान त्याला हळूहळू उभा करण्यात येईल. हेच काम आता आव्हानाचा आणि परीक्षा पाहणार असणार आहे असं सोमनाथ यांनी स्पष्ट केलं.