Chandrayaan 3 Live Tracker : आज भारत रचणार इतिहास!! चंद्रयान-3 काही तासांत चंद्रावर उतरणार; असं करा Live Track

टाइम्स मराठी । आजचा दिवस भारतीयांसाठी मोठा गौरवाचा दिवस आहे. भारत हाच नवा इतिहास रचणार आहे. भारताचे चंद्रयान मिशन 3 आज संध्याकाळी 6 वाजून 04 मिनिटांनी चंद्रावर सॉफ्ट लँडिंग (Chandrayaan 3 Live Tracker) करणार आहे. चांद्रयानाच्या सॉफ्ट लँडिंग कडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले असून प्रत्येक जण या क्षणाची वाट पाहत आहे. मंगळवारी 22 ऑगस्टला इस्रोने या मिशन बद्दल अपडेट देत संपूर्ण सिस्टीम व्यवस्थित काम करत असल्याचे सांगितलं. इस्रो कडून यापूर्वी वातावरण अनुकूल असल्यावरच 23 ऑगस्टला लँडिंग करण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं. आता वातावरण अनुकूल असल्यामुळे कोणत्याही प्रकारची अडचण नसल्यामुळे आज 6.04 मिनिटांनी आपण वाट पाहत असलेला क्षण येणार आहे.

   

Chandrayaan 3 मिशनने कॅप्चर केले चंद्राचे फोटो-

ISRO ने चांद्रयान मिशन बाबत अपडेट देत चांद्रयान 3 ने कॅप्चर केलेली चंद्राचे फोटो शेअर केले आहे. हे फोटोज चंद्रयान मिशन ने 70 किलोमीटरच्या अंतरावरून लँडर पोझिशन डिटेक्शन कॅमेऱ्याच्या माध्यमातून काढलेआहेत. सध्या चंद्रयान 3 मिशन हे चंद्रावर लँडिंग साठी एक जागा शोधत आहे. चांद्रयान मिशन साठी वापरण्यात येणारे विक्रम लँडर हे चंद्राच्या पृष्ठभागावर 25 किलोमीटरच्या हाईट वरून लँड करण्यात येणार आहे. 23 ऑगस्टला म्हणजेच आज 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्रयान 3 दक्षिण ध्रुवाच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करेल.

चांद्रयान 3 कोठे आहे हे लाईव्ह ट्रॅकर च्या मदतीने समजणार

भारतासाठी अभिमानाचा आणि अविस्मरणीय असा हा क्षण जवळ आला आहे. चांद्रयान तीन सध्या चंद्राच्या 25 किलोमीटर अंतरावर असून दक्षिण ध्रुवावर सूर्योदय होण्याची वाट पाहत आहे. संध्याकाळी पाच वाजून 45 मिनिटांनी चांद्रयान तीन मिशन विक्रम लँडर चंद्रावर उतरण्याचा प्रयत्न करेल. त्यानंतर सहा वाजून चार मिनिटांनी चांद्रयान मिशन चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करेल. चांद्रयान तीनच्या गतीवर आणि दिशावर इस्रो सध्या लक्ष ठेवून आहे. यासाठी एक लाईव्ह ट्रॅकर देखील लाँच करण्यात आले आहे. या लाईव्ह ट्रॅकरच्या (Chandrayaan 3 Live Tracker) माध्यमातून चांद्रयान तीन विक्रम लँडर यावेळेस कोठे आहे हे समजू शकते.

दक्षिण ध्रुवावर आतापर्यंत कोणीही करू शकले नाही लँडिंग

जर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान 3 ने लँडिंग केले, तर हा दक्षिण ध्रुवावर लँड होणारा भारत हा पहिलाच देश बनेल. कारण आतापर्यंत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर कोणी लँडिंग करू शकलेले नाही. आणि चंद्रावर उतरणारा चौथा देश म्हणून देखील भारत ओळखला जाईल.

सॉफ्ट लँडिंगचे थेट प्रक्षेपण कस पाहणार? Chandrayaan 3 Live Tracker

चांद्रयान 3 च्या सॉफ्ट लँडिंग चे थेट प्रक्षेपण इस्रोच्या वेबसाईटवर करण्यात येणार आहे. यासोबतच युट्युब, फेसबुक, डी डी दूरदर्शन चैनल यासारख्या प्लॅटफॉर्मवरून देखील प्रसारित करण्यात येणार आहे. यासाठी इस्रोची वेबसाईट isro.gov. in, युट्युब ची लिंक youtube.com/watch?v=DLA_64yz8Ss ही आहे. फेसबुक वर http://facebook.com/ISRO या लिंक वरून तुम्ही चांद्रयान तीन लाईव्ह बघू शकतात. चांद्रयान मोहिमेच्या सॉफ्ट लँडिंग चा क्षण हा अविस्मरणीय असेल. यासोबतच विद्यार्थ्यांच्या मनात संशोधनाची भावना जागवण्याचा प्रयत्न देखील करता येईल.