Chandrayaan 3 : चंद्रयान 3 मोहिमेसाठी चंद्रयान 2 पेक्षा कमी खर्च; याचे नेमके कारण काय?

टाइम्स मराठी । येत्या शुक्रवारी म्हणजेच १४ जुलै रोजी श्रीहरीकोटामधील सतीश धवन स्पेस सेंटर येथून चंद्रयान ३ (Chandrayaan 3) अंतराळात झेप घेणार आहे. त्यामुळे हा दिवस इस्त्रोसाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे. चंद्रयान २ ची मोहीम अयशस्वी झाल्यामुळे आता इस्त्रोने चंद्रयान ३ साठी तयारी दाखवली आहे. त्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष या मोहीमेकडे टिकून राहणार आहे. परंतु हे सगळं करत असताना या मोहिमेसाठी नेमका खर्च किती करावा लागत असेल असा प्रश्न तुमच्या मनात कधी आलाय का? चला तुमच्या प्रश्नाचे उत्तर आम्ही देतो.

   

चंद्रयान ३ साठी ६१५ कोटी रुपये खर्च – Chandrayaan 3

मुख्य म्हणजे, चंद्रयान २ पेक्षा चंद्रयान ३ साठीचा खर्च सर्वात कमी करण्यात आला आहे. यापूर्वी देखील अंतराळात पाठवण्यात आलेल्या यानांवर खूप कमी खर्च करण्यात आला होता. आता हीच परंपरा चंद्रयान ३ साठी राबविण्यात आली आहे. या मोहिमेसाठी इस्त्रोने फक्त ६१५ कोटी रुपये खर्च केले आहेत. मात्र तरी देखील हा खर्च चंद्रयान २ पेक्षा तस म्हंटल तर कमीच आहे. कारण की, चंद्रयान २ साठी तब्बल ९७८ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.

समोर आलेल्या माहितीनुसार, चंद्रयान ३ साठी (Chandrayaan 3) ऑर्बिटर ऐवजी यामध्ये प्रोपल्शन मॉड्यूलचा वापर करण्यात आला आहे. प्रोपल्शन मॉड्यूलचा खर्च खूप कमी असल्यामुळे चंद्रयान ३ साठी जास्त पैसे खर्च करण्यात आले नाहीत. त्यामुळे इतर देशांपेक्षा भारताने कमी खर्चात आपली मोहित यशस्वीरित्या राबवली आहे. यापूर्वी चीनने चांग-ई ४ मून मिशनसाठी ६९.३८ लाख कोटी रुपये खर्च केले होते. तर अमेरिकेने चांद्र मोहिमांसाठी ८२५ लाख कोटी रुपये खर्च केला होता. या तुलनेने भारत सर्वात कमी खर्च करत असल्याचे दिसत आहे.

दरम्यान आता सर्वजण चंद्रयान ३ ची (Chandrayaan 3) उड्डाण घेण्याची वाट पाहत आहेत. ही मोहीम यशस्वी होण्यासाठी शास्त्रज्ञांनी दिवस रात्र मेहनत घेतली आहे. शुक्रवारी चंद्रयान ३ चे प्रक्षेपण २ वाजून ३५ मिनिटांनी दाखवण्यात येणार आहे. हा क्षण भारतासाठी सर्वात महत्वाचा ठरणार आहे.