Chandrayaan 3 च्या लॉन्चिंग पूर्वी मोदींचे खास Tweet; तुम्हांलाही वाटेल अभिमान

टाइम्स मराठी | आज भारतासाठी सर्वात महत्वाचा दिवस आहे. कारण की, ठिक २ वाजून ३५ मिनीटांनी चंद्रयान-३ (Chandrayaan 3) मोहिम अवकाशात झेप घेण्यासाठी सज्ज होईल. त्यामुळे सर्व भारतीयांचे लक्ष याकडे लागले आहे. भारत पुन्हा चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्याचा प्रयत्न करणार आहे. या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत मोहिमेसाठी भारतीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.

   

त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, १४ जुलै हा दिवस सुवर्ण अक्षरात कोरला जाईल. आज चंद्रयान-३ मोहिम आपल्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. ही उल्लेखनीय मोहिम आपल्या देशाच्या आशा आणि स्वप्नांना पुढे घेऊन जाईल. चंद्रयान-३ ३००,००० किमी पेक्षा जास्त अंतर कापून ते पुढील काही आठवड्यात चंद्रावर पोहोचेल.

शास्त्रज्ञांचे मानले आभार – (Chandrayaan 3)

नासाच्या शास्त्रज्ञांविषयी कृतज्ञता व्यक्त करत मोदी म्हणाले की, भारतीय अंतराळ क्षेत्राचा इतिहास खूप समृध्द आहे. त्यासाठी मी शास्त्रज्ञांचे आभार मानतो. चंद्रयान-१ हे जागतिक चंद्र मोहिमांमध्ये अग्रणी मानले जाते कारण की, त्याने चंद्रावर पाण्याच्या रेणूंच्या उपस्थितीची पुष्टी केली आहे. ही गोष्ट आजवर जगभरातील २०० हून अधिक वैज्ञानिक प्रकाशनांमध्ये प्रकाशित झाली आहे.

त्याचबरोबर, मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की, या मोहिमेबद्दल (Chandrayaan 3) आणि अंतराळ, विज्ञान आणि नवकल्पना या क्षेत्रात केलेल्या प्रगतीबद्दल अधिक जाणून घ्या.  यामुळे तुम्हा सर्वांना याचा अभिमान वाटेल.  भारतीय अंतराळ संशोधन संस्था चार वर्षांनंतर चंद्रावर पाठवण्याच्या तिसर्‍या मोहिमेसाठी पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. सर्व देशांचे लक्ष या मोहिमेकडे लागून आहे.

चंद्रावर यानाचे ‘सॉफ्ट लँडिंग’ झाले तर इस्त्रोचे हे अभियान यशस्वी झाले म्हणता येईल. यानंतर भारताचा समावेश निवडक देशांच्या यादीत होईल. असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. दरम्यान अवघ्या काही तासातच हे चंद्रयान-३ (Chandrayaan 3) अवकाशात भरारी घेणार आहे. या मोहिमेसाठी सर्वांनी भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत.