Chandrayaan 3 : चंद्रावर झेप घेण्यासाठी चंद्रयान ३ सज्ज; कधी आणि कुठे पाहू शकता थेट प्रक्षेपण?

टाइम्स मराठी । भारतीय अंतराळ संशोधन संस्थेसाठी उद्याचा म्हणजेच १४ जुलै २०२३ हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. शुक्रवारी श्रीहरिकोटा येथील स्पेसपोर्टवरुन दुपारी ठिक २ वाजून ३५ मिनिटांनी चंद्रयान ३ (Chandrayaan 3)उड्डाण घेणार आहे. चंद्रयान ३ चे प्रक्षेपण दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी दाखवण्यात येईल. त्यामुळे या मोहिमेकडे भारतासह संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. चंद्रावर अंतराळयान उतरवण्याचा भारताचा हा दुसरा प्रयत्न असेल. या यानात लँडर, रोव्हर आणि प्रोपल्शन मॉडय़ुल आहे. या यानाचे वजन 3900 किलोग्राम आहे.

   

२३ किंवा २४ ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार– (Chandrayaan 3)

शुक्रवारी चंद्रयान ३ (Chandrayaan 3) ने उड्डाण घेतल्यानंतर ते ३.८४ लाख किमीचा प्रवास करुन २३ किंवा २४ ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याची शक्यता आहे. ही मोहीम यशस्वी पार पडण्यासाठी शास्त्रज्ञांनी तिरुपती वेंकटचलापती मंदिरात दर्शन घेत आशीर्वाद मागितले आहेत. हे चंद्रयान १४ दिवस चंद्रावर राहून त्यांच्या पृष्टभागाचे निरीक्षण करणार आहे. या चंद्रयानात प्रोपल्शन मॉड्यूल, लँडर आणि रोव्हर यांचा समावेश करण्यात आला आहे. या चंद्रयान३ मोहिमेसाठी लागणारी इंजिन मुंबईत बनवण्यात आले आहे. याची निर्मीती विक्रोळी येथील गोदरेज कंपनीत करण्यात आली आहे. मोहिमेसाठी लागणणाऱ्या अशा अनेक लागणाऱ्या गोष्टी वेगवेगळ्या महत्वाच्या ठिकाणी बनवण्यात आल्या आहेत.

दरम्यान यापूर्वी २०१९ मध्ये लँडर आणि रोव्हर चंद्रावर सॉफ्ट लँड करु न शकल्यामुळे चंद्रयान २ मोहिम अयशस्वी ठरली होती. तरीही त्याचे ऑर्बिटर अजूनही शाबूत असल्यामुळे ते चंद्राभोवती प्रदक्षिणा घालत आहे. आता चंद्रयान ३ (Chandrayaan 3) ही चंद्रयान २ च्या मोहिमेचाच भाग आहे. ही मोहिम यशस्वी होण्यासाठी चहूबाजूंनी शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. आजवर चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडीग फक्त अमेरिका, रशिया, चीन याच देशांनी केले आहे. आता भारताची मोहीम यशस्वी झाली तर भारत चंद्रावर स्वारी करणारा चौथा देश बनेल.