Chandrayaan 3 च्या यशामागे ‘या’ 8 नायकांचा मोलाचा वाटा

टाइम्स मराठी । भारताचे चंद्रयान मिशन 3 (Chandrayaan 3) च्या सॉफ्ट लँडिंग कडे सर्वांचे लक्ष लागून होते. काल सहा वाजून चार मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवेवर लेंडर विक्रम ने सॉफ्ट लँडिंग केली. अपयशानंतर यश मिळतं हे नक्कीच खरं. कारण चंद्रयान टू मिशन अपयशी ठरल्यानंतर चांद्रयान तीन यशस्वीरित्या पार पाडले. 14 जुलैला हे चांद्रयान तीन मिशन लॉन्च करण्यात आले होते. तेव्हापासून ते चांद्रयान यशस्वी होण्यापर्यंत या चांद्रयान मोहिमेमध्ये इस्रोचे आठ नायक दिवस-रात्र काम करत आहेत. चंद्रयान तीन मिशन लॉन्च करण्यापूर्वीपासून ते चांद्रयान तीन मिशन साठी परिश्रम घेत आहेत. आणि अखेर त्यांच्या परिश्रमाला यश आले असून या ८ पडद्यामागील नायकांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर तिरंगा फडकवून भारतीयांची मान उंचावली आहे. आणि भारताला एक वेगळ्या जागेवर नेऊन ठेवले आहे.

   

भारतीय अंतराळ संशोधन म्हणजेच इस्रो चे शास्त्रज्ञ महिने नाहीतर चार वर्षापासून चांद्रयान तीन मिशनच्या लँडर वर काम करत आहे. कोरोना महामारीचे संकट भारतात आलेले असतानाही हे सर्वजण चंद्रयान मिशनच्या तयारीमध्ये व्यस्त होते. नक्कीच त्यांच्या या मेहनतीचे फळ काल मिळाले. तर जाणून घेऊया या पडद्यामागील आठ नायकांबद्दल .

चांद्रयान तीन मिशन यशस्वीरित्या पार पाडण्यामध्ये फक्त पुरुषांचा नाही तर महिलांचा देखील समावेश आहे. या मिशनसाठी महिला शास्त्रज्ञ आणि इंजिनीयर यांनी देखील महत्त्वाची भूमिका बजावली. या मिशनमध्ये एस सोमनाथ, प्रकल्प संचालक पी विरुमुथूवेल, मिशन डायरेक्टर मोहना कुमार, विक्रम साराभाई स्पेस सेंटर चे संचालक एस उन्नीकृष्णन नायर, यु आर राव सॅटेलाईट सेंटरचे संचालक एम शंकरन, आणि लॉन्च ऑथोरायझेशन बोर्ड या सर्वांचा मोलाचा वाटा यामध्ये होता. त्याचबरोबर प्रमुख भूमिका ही राज राजन यांनी साकारली.

एस सोमनाथ- (Chandrayaan 3)

इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी चांद्रयान तीन मोहिमेमध्ये व्हेईकल मार्क तीनच्या सहाय्याने चांद्रयान तीन कक्षेमध्ये पोहोचण्यासाठी मदत केली. त्यांनी हे व्हेईकल मार्क तीन किंवा बाहुबली रॉकेटच्या डिझाईन मध्ये मदत केली. एस सोमनाथ हे बेंगलोर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स चे माजी विद्यार्थी आहेत.

प्रकल्प संचालक वीरमुथुवेल

चांद्रयान तीन (Chandrayaan 3) मिशनचे प्रकल्प संचालक वीरमुथुवेल यांनी चेन्नई येथील मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये शिक्षण घेतले आहे. त्यांनी चांद्रयान दोन आणि मंगळ यान या दोन्ही मिशनमध्ये काम केले आहे. त्यामुळे चंद्रयान तीन मिशन वेळी त्यांचा अनुभव कामात आला. आणि मिशन बळकट करण्यासाठी देखील त्यांची मदत झाली.

मिशन डायरेक्टर मोहना कुमार

मिशन डायरेक्टर मोहना कुमार हे चंद्रयान तीन मिशनचे डायरेक्टर आहेत. त्याचबरोबर विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांनी यापूर्वी LVM3 M3 या मिशनवर वन वेब इंडिया 2 या उपग्रहाचे संचालन केले होते

व्हीएसएससी चे संचालक एस उन्नीकृष्णन नायर

चांद्रयान तीन मिशनच्या यशामध्ये सहभागी असलेल्या उन्नीकृष्णन नायर यांनी जिओ सिक्रोनन्स सॅटेलाईट लॉन्च व्हेईकल JSLV मार्क 3 हे लॉन्च केले आहे. चंद्रयान तीन या मोहिमेमध्ये त्यांनी गंभीर पैलू वर देखरेख केली. त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मधून शिक्षण घेतलेले आहे. त्याचबरोबर ते एरोस्पेस अभियंता देखील आहेत.

एम शंकरन, यु आर राव उपग्रह केंद्राचे संचालक

एम शंकरांना इस्त्रोचे पावर हाऊस मानले जाते. नवीन ऊर्जा प्रणाली आणि ऊर्जा उपग्रहांकडे येणारे सौर ऑरे तयार करण्यामध्ये ते माहीर आहेत. त्यांच्याकडे उपग्रह बनवण्यासाठी अनुभव आहे. त्याचबरोबर त्यांनी चंद्रयान वन, मंगळयान आणि चांद्रयान टू या उपग्रहांमध्ये देखील मोलाचा सहभाग नोंदवला होता.

लॉन्च ऑथोरायझेशन बोर्ड प्रमुख ए राजराजन

हे एक प्रतिष्ठित शास्त्रज्ञ आहेत. ए राज राजन सध्या श्रीहरीकोटा या ठिकाणी असलेल्या सतीश धवन अंतराळ केंद्र SHAR याचे संचालक आहेत. चांद्रयान तीन ला त्यांनी कक्षेमध्ये ठेवले. त्याचबरोबर ते कंपोझिट क्षेत्रातील तज्ञ आहेत.

यु आर राव सॅटेलाईट डेप्युटी प्रोजेक्टर संचालक कल्पना

कल्पना यांचा चांद्रयान दोन आणि मंगळ यान या दोन्ही मोहिमेमध्ये सहभाग होता. कोरोना महामारीच्या काळामध्ये हलाकीचे वातावरण असताना देखील त्यांनी चांगल्या तीन टीम सोबत काम केले. एक इंजिनियर म्हणून त्यांनी त्यांचे आयुष्य भारताच्या उपग्रह बनवण्यामध्ये समर्पित केले आहे.

रितू करीधल श्रीवास्तव

हे इसरोमधील वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत. त्याचबरोबर भारताच्या मार्च ऑडिटर मिशनच्या ऑपरेटर डायरेक्टर देखील आहेत. त्यांचा जन्म लखनऊ मध्ये झालेला होता. त्याचबरोबर त्यांनी 1996 मध्ये लखनऊ विद्यापीठातून भौतिक शास्त्रामध्ये एमएससी केली. आणि त्यानंतर बंगळूर येथून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये एरोस्पेस अभियांत्रिकी विभागातून एमटेक देखील केले. त्यांचा देखील चांद्रयान तीन मोहिमेमध्ये मोलाचा वाटा होता.

यास आठ नायकांनी दिलेल्या सहकार्यामुळे आणि त्यांच्या मेहनतीमुळे आज चंद्रयान तीन मिशन यशस्वी झाले आहे. या आठ नायकांमुळे भारत हा दक्षिण ध्रुवावर लँडिंग करणारा पहिला देश आणि चंद्रावर पाऊल ठेवणारा चौथा देश बनला आहे. अखेर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर देखील भारताने तिरंगा फडकावला. त्यामुळे या आठ नायकांना संपूर्ण देशाचा सलाम.