Chandrayaan 3 : भारताकडून चंद्रयान मोहीमा का राबवण्यात येतात? यामुळे नेमका काय फायदा होतो?

टाइम्स मराठी । आज संपूर्ण भारताचे लक्ष चंद्रयान-३ (Chandrayaan 3) या मोहीमेवर लागले आहे. श्रीहरीकोटा येथून ठिक २ वाजून ३५ मिनीटांनी चंद्रयान-३ अवकाशात झेप घेण्यासाठी उड्डाण करेल. त्यामुळे हा क्षण सर्वांत खास असणार आहे. चंद्रयान-२ मोहीम अयशस्वी झाल्यानंतर आता नासाच्या शास्त्रज्ञांनी चंद्रयान-३ साठी कंबर कसली आहे. मात्र आपल्याला हे माहित आहे का की, नासाकडून ही चंद्रयान मोहीम का राबण्यात येते. किंवा त्या मागचे नेमके कारण काय असते. याबाबत खूलासा करत नासाच्याच शास्त्रज्ञांनी माहिती दिली आहे की, इतिहासांच्या पुराव्यानुसार चंद्र हा पृथ्वीपासून तयार झाल्याची शक्यता आहे. यासंबंधीत पुरावे पृथ्वीच्या भूगर्भीय भागात नष्ट झाले असावेत. त्याचबरोबर, पृथ्वी-चंद्र प्रणाली आणि सौर यंत्रणा कशी निर्माण झाली. तसेच या सर्वांचा विकास कसा झाला याचा शोध शास्त्रज्ञ लावू शकतात. तसेच इतर लघुग्रहांचा अभ्यास देखील करण्यात येऊ शकतो. 

   

चंद्रयान मोहिमेचा उद्देश काय ? (Chandrayaan 3)

चंद्रयान मोहीम ही (Chandrayaan 3) अत्यंत जोखमीची आहे. मात्र यामुळे माणंसाना दुसऱ्या जगात राहण्याचा आणि काम करण्याचा अनुभव मिळेल. मोहिमेच्या माध्यमातून आपल्याला प्रगत साहित्य, उपकरणं तापमान आणि अंतराळातल्या अत्यंत किरणोत्सर्गाची चाचणी देखील घेता येईल. तसेच चंद्रयावरील इतर महत्वाच्या गोष्टींचा शोध आपल्याला यामुळे लागू शकतो. या सर्व अंगाने चंद्रयावर मोहीम राबवणे महत्वाचे आहे.

चंद्रयान मोहीमेबाबत (Chandrayaan 3) नासाने हे देखील म्हटले आहे की, या मोहीमा यशस्वी पार पडल्यानंतर मानव पृथ्वीवरील जीवन वाढवतील. तसेच आपल्या उर्वरित सौरमालेचा आणि त्यापुढच्या भागाचा शोध घेण्यासाठी तयार होतील. महत्वाचे म्हणजे, मोहीमेमुळे माणुस दुर्गम भागात शोध घेण्यासाठी तसेच धोकादायक भागातील माहिती काढण्यासाठी रोबोट्सचा वापर कसा केला जातो हे देखील यामुळे शिकेल.

दरम्यान चंद्रयान ३ मोहीम यशस्वी झाल्यानंतर एकट्या भारताच्या तीन चंद्रमोहिमा झाल्या असतील. मुख्य म्हणजे, आज नासाकडून चंद्रयान-३ ची मोहीम राबवली जात आहे. जी चंद्रयान- २ चा भाग आहे. ही चंद्रयान मोहीम यशस्वी होण्यासाठी संपूर्ण नासाची टीम काम करत आहे. भारतासाठी ही मोहीम एक मोठे आवाहन आहे. त्यामुळे संपूर्ण भारताचे लक्ष याकडे लागले आहे.