Chandrayaan 3 Update : भारत रचणार इतिहास!! चांद्रयान चंद्रापासून फक्त 25 KM दूर

टाइम्स मराठी । भारताचे मिशन चांद्रयान (Chandrayaan 3 Update) लवकरच नवा इतिहास रचणार आहे. चांद्रयान-3 चंद्राच्या अत्यंत जवळ पोहोचलं असून अवघ्या २५ KM अंतरावर आहे. तर दुसरीकडे रशियाचे Luna २५ मध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याने ते भरकटले आहे. लुना मधील बिघाड दुरुस्त नाही झाला नाही तर भारताचे लँडर मॉड्यूल सर्वात आधी चंद्रावर उतरेल आणि देशासाठी हि सर्वात मोठी उपलब्धी असेल.

   

ISRO ने दिली माहिती- (Chandrayaan 3 Update)

स्पेस एजन्सी ISRO ने याबाबत ट्विट करून माहिती दिली. लँडर मॉड्यूलने आपलं दुसरं आणि शेवटचं डिब्यूस्टिंग ऑपरेशन यशस्वीपणे पूर्ण केलं आहे. आता त्याची कक्षा कमी होऊन 24 किलोमीटर x 134 किलोमीटर राहिली आहे, असं ट्विट ISRO ने केलं आहे. जर सर्व काही व्यवस्थित राहिलं तर भारताची ही मोहीम फत्ते होईल आणि 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 वाजून 47 मिनिटांनी चांद्रयान- 3 हे चंद्रावर (Chandrayaan 3 Update) उतरेल.

दरम्यान, 17 ऑगस्ट 2023 रोजी चांद्रयान-3 च्या विक्रम लँडरने प्रोपल्शन मॉड्यूल सोडले होते. यानंतर लँडर एकटाच पुढे मार्गक्रमन करत होता. 18 ऑगस्टच्या दुपारी विक्रम लँडर आणि प्रोपल्शन मॉड्यूल 153 किमी x 163 किमीच्या कक्षेत होते. मात्र त्यानंतर दोघांचे मार्ग वेगळे झाले होते. यानंतर विक्रम लँडर 113 किमी x 157 किमीच्या कक्षेत आले. तेव्हा त्याचे अंतर चंद्राच्या भूमीपासून फक्त 113 किलोमीटर होते. सध्या विक्रम लँडर विरुद्ध दिशेने जात आहे. तसेच त्याची उंची आणि वेग कमी होत आहे.