Chandrayaan 3 Update : चांद्रयानाच्या लँडिंगची वेळ बदलली; ISRO ने दिली महत्त्वाची माहिती

टाइम्स मराठी । सध्या चांद्रयान 3 (Chandrayaan 3 Update) मोहीमचे लँडर चंद्राच्या कक्षेमध्ये चंद्राचा पृष्ठभागापासून 25 किलोमीटर अंतरावर चंद्राभोवती भ्रमण करत आहे. चांद्रयानाच्या सॉफ्ट लँडिंग कडे सर्वांचे लक्ष लागलेले असून या सॉफ्ट लँडिंगला आता २ दिवस उरले आहे. चांद्रयान 3 चे लॉन्चिंग 14 जुलैला करण्यात आले होते. यासोबतच एका महिन्यापूर्वी रशियाने देखील चंद्र मिशन लुना 25 लॉन्च केले होते. परंतु काल रशियन यान लुना चंद्रावर कोसळले आहे. त्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष्य आता भारताच्या चांद्रयानाकडे लागलं आहे. परंतु आता चांद्रयानाच्या लँडिंगच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. ISRO ने याबाबत माहिती दिली आहे.

   

या वेळेत होईल चांद्रयानचे सॉफ्ट लँडिंग

इस्रोने चांद्रयान 3 ची लँडिंग वेळ (Chandrayaan 3 Update) ही 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 वाजून 47 मिनिटे अशी ठेवली होती. परंतु आता ही वेळ बदलण्यात आली असून 17 मिनिटे आणखीन उशिरा लँडिंग करण्यात येणार आहे. म्हणजेच चांद्रयान 3 हे 3 ऑगस्टला 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. महत्त्वाचे म्हणजे हे चांद्रयान 3 चे विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरताना आपण Live पाहू शकतो. चांद्रयान 3 मोहिमेचे थेट प्रसारण करण्यात येणार आहे. हे प्रसारण भारतीय प्रमाण वेळेनुसार 5 वाजून 27 मिनिटांनी करण्यात येईल. याबाबत इस्त्रोने माहिती दिली आहे.

कस पाहता येणार Live मध्ये– (Chandrayaan 3 Update)

चांद्रयान 3 च्या सॉफ्ट लँडिंग चे थेट प्रक्षेपण इस्रोच्या वेबसाईटवर करण्यात येणार आहे. यासोबतच युट्युब, फेसबुक, डी डी दूरदर्शन चैनल यासारख्या प्लॅटफॉर्मवरून देखील हे लँडिंग प्रसारित करण्यात येणार आहे. इस्रो म्हणाले की,चांद्रयान मोहिमेच्या सॉफ्ट लँडिंगचा क्षण हा अविस्मरणीय असेल. यासोबतच विद्यार्थ्यांच्या मनात संशोधनाची भावना जागवण्याचा प्रयत्न देखील करता येईल.

रशियन लुना 25 झाले क्रॅश

दरम्यान, रशियन Luna 25 लॅन्डर चंद्राच्या पृष्ठभागावर क्रॅश झाल्यानंतर जगभरात निराशेचे वातावरण बघायला मिळत असून भारतात इस्रोच्या चांद्रयान तीन मिशन साठी सर्वजण प्रार्थना करत आहे. रशियन अंतराळ संस्थेने रविवारी लुना सोबत घडलेल्या घटनेबद्दल माहिती दिली. ते म्हणाले की Luna 25 हे यान चंद्रावर कोसळले आहे. मानवरहीत रोबोटिक लँडर अनियंत्रित झाल्यामुळे चंद्रावर आदळले. रशियाचे हे 1976 नंतरचे म्हणजे 47 वर्षानंतर रशियाचे पहिले चंद्रयान मिशन होते.