Chandrayaan 3 Update : चंद्रावर सापडले Oxygen!! ISRO ने जगाला दिली खुशखबर

टाइम्स मराठी । चांद्रयान 3 (Chandrayaan 3 Update) मिशनने चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करून चंद्रावर भारताचा झेंडा रोवला आहे. हे मिशन यशस्वीपणे पार पडल्यामुळे भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग करणारा पहिला देश बनला आहे. आता चंद्रयान 3 च्या रोव्हरने चंद्राच्या पृष्ठभागावर ऑक्सिजन असल्याची माहिती दिली आहे. एवढेच नाही तर चंद्राच्या पृष्ठभागावर ॲल्युमिनियम सल्फर कॅल्शियम, आयर्न, क्रोमियम, टायटॅनियम, मॅगनीज सिलिकॉन देखील असल्याचा या रोवरने खुलासा केला आहे.

   

ISRO ने दिली माहिती- Chandrayaan 3 Update

ही संपूर्ण जगासाठी सर्वात मोठी आणि चांगली बातमी असून याबाबत इस्त्रोने माहिती दिली. इस्त्रोने सांगितले की, चांद्रयांच्या रोवर प्रज्ञानला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सल्फर, ॲल्युमिनियम, कॅल्शियम, आयर्न, क्रोमियम, टायटॅनियम मॅग्नीज सिलिकॉन ऑक्सिजन यासारख्या गोष्टींचा शोध लागला आहे. या सर्व गोष्टींचा शोध लागलेला असून आता सध्या चंद्रावर हायड्रोजन चा शोध घेणे सुरू आहे.

मंगळवारी इस्रो ने चांद्रयान 3 च्या रोव्हर प्रज्ञान वर (Chandrayaan 3 Update) बसवण्यात आलेल्या उपकरणाच्या माध्यमातून दक्षिण ध्रुवावर सल्फर असल्याची माहिती स्पष्टपणे मिळाली. यासोबतच ॲल्युमिनियम, कॅल्शियम, लोह, क्रोमियम, टायटॅनियम, मॅगनिज, सिलिकॉन, ऑक्सिजन यासारख्या सर्व गोष्टी असल्याचं देखील या उपकरणांमध्ये दिसले आहे. याबाबत इस्रो ने सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली.

त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितलं की, वैज्ञानिकांचे प्रयोग प्रगती प्रथावर आहे. रोवरला बसवण्यात आलेल्या लेझर ड्राइव्हन ब्रेक डाऊन स्पेक्ट्रोस्कोप LIBS या उपकरणाच्या माध्यमातून चंद्राच्या पृष्ठभागावर असलेल्या गोष्टींची माहिती मिळाली. लॅन्डरवर लावण्यात आलेले हे उपकरण इलेक्ट्रो ऑप्टिक सिस्टीम इस्रो बेंगलोर येथील प्रयोग शाळेमध्ये विकसित करण्यात आले आहे. वैज्ञानिकांना अपेक्षा होती त्याप्रमाणे ॲल्युमिनियम, कॅल्शियम, लोह, क्रोमियम, टायटॅनिझम, मॅग्नीज, सिलिकॉन, ऑक्सिजन यासारख्या गोष्टींची माहिती मिळाली. आणि या सोबतच हायड्रोजनचा शोध घेणे देखील सध्या सुरू आहे.

यापूर्वी, सोमवारी इस्रोकडून एक माहिती मिळाली होती. याबाबत इस्रोने सांगितलं की चांद्रयान तीन साठी पाठवण्यात आलेले रोव्हर प्रज्ञान हे चंद्राचं पृष्ठभागावर फिरत असताना चार मीटर खोल असलेल्या खड्ड्याजवळ आले. आणि त्यानंतर त्याला मागे जाण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानंतर आता हे रोव्हर नवीन मार्गावर सुरक्षितपणे जात आहे. दरम्यान, चंद्रावर आणखी कशाकशाचा शोध लागतो हे पाहणे औत्सुक्याचे आहे.