Chandrayaan 3 Update : विक्रम लँडरने पाठवला चंद्रावरचा पहिला व्हिडिओ; ISRO ट्विट करून दिली माहिती

टाइम्स मराठी । भारताचे चंद्रयान मिशन 3 च्या (Chandrayaan 3 Update) सॉफ्ट लँडिंग यशस्वीपणे पार पडले . 23 ऑगस्ट ला सहा वाजून चार मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवेवर लेंडर विक्रम ने सॉफ्ट लँडिंग केलं आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग करणारा पहिला देश म्हणून भारताला ओळख मिळाली. 14 जुलैला हे चांद्रयान तीन मिशन लॉन्च करण्यात आले होते. आता स्टॉप लँडिंग नंतर लँडर इमेजरने कॅमेरा मधून एक व्हिडिओ इस्रोला पाठवला आहे. हा चंद्रावरचा पहिला व्हिडिओ असून इस्रो ने ट्विट करून याबाबत माहिती दिली.

   

काय आहे व्हिडिओ मध्ये- (Chandrayaan 3 Update)

इस्रो ने केलेल्या ट्विट मध्ये रोवर सुरक्षितपणे काम करत असल्याचं दिसत आहे . लॅन्डरने शूट केलेला पहिला व्हिडिओ असून या सोबतच रोव्हर देखील यशस्वीरित्या हालचाल करत असल्याचं दिसून येतं. यानंतर आता या मिशन मधील निरीक्षण आणि संशोधनासाठी महत्त्वाचा डेटा इस्त्रोला मिळू शकेल. इस्रोने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये चंद्राचा पृष्ठभाग दिसत आहे. आतापर्यंत चंद्राला स्पर्श करण्यासाठी 12 देशांनी प्रयत्न केले. यासाठी आतापर्यंत 141 मोहिमा करण्यात आल्या. त्यापैकी पाच मोहिमांना थोड्याफार प्रमाणात यश मिळालं. आत्तापर्यन्त 69 मोहिमा यशस्वी ठरल्या तर 59 मोहीम यशस्वी होऊ शकल्या नाही.

चांद्रयान 2 अपयशी ठरल्यानंतर चांद्रयान ३ ने (Chandrayaan 3 Update) चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करून भारतीयांच्या माना उंचावल्या. चांद्रयान ३ साठी काही महिन्यांपूर्वी नाहीतर तीन-चार वर्षांपासून सर्व वैज्ञानिक अथक प्रयत्न करत होते. कोरोना महामारीच्या काळात सर्वजण काळजी म्हणून घरात बसलेले असताना सर्व वैज्ञानिकांनी वेळ देत चांद्रयान तीन साठी ची तयारी सुरू केली होती . चांद्रयान 1 चा प्रवास हा देखील यशस्वी झाला होता. या चंद्रयान एक ने चंद्रावर पाण्याचे अंश असल्याचे सांगितलं होतं. त्यात त्यामुळे त्याचा जास्त अभ्यास करणे गरजेचे असल्यामुळे चांद्रयान दोन मोहीम सुरू करण्यात आली होती. परंतु चांद्रयान दोन ही मोहीम अपयशी ठरली. अपयश आल्यावर देखील वैज्ञानिकांनी न खचता चांद्रयान तीन ही मोहीम यशस्वी करून दाखवली.