Chandrayaan 3 : चंद्रावर जाण्याची लगबग कशासाठी? सर्वच देशात स्पर्धा का लागलीये?

टाइम्स मराठी । सध्या चंद्रयान चंद्राच्या (Chandrayaan 3) जवळ पोहोचले असून काही दिवसातच ही मोहीम अंतिम वळणावर पोहोचेल. सर्वांचे चांद्रयानाच्या सॉफ्ट लँडिंग कडे लक्ष लागून आहे. भारताची तिसरी चंद्रयान मोहीम असून 23 ऑगस्टला चांद्रयान चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणार आहे. 14 जुलैला चांद्रयान 3 लॉन्च करण्यात आले होते. चांद्रयान आता शेवटचा टप्प्यात असल्यामुळे भारतासह संपूर्ण जगाच्या नजरा इस्रोच्या मिशन मून वर लागलेल्या आहेत. आज चांद्रयानाचे लँडर आणि प्रपोर्शन मॉडेल वेगळे होणार आहे. चांद्रयान सोबतच एका महिन्यापूर्वी रुस ने देखील चंद्र मिशन लुना 25 लॉन्च केले होते. हे रशियन लॅन्डर आणि भारतीय यान दोन्ही 23 ऑगस्टला चंद्रावर पोहोचेल असं सांगण्यात येत आहे. सध्या चंद्रयान मोहीम सुरू असल्याचं आपल्या सर्वांना माहिती आहे परंतु तुम्हाला माहिती आहे का भारताचे हेच मिशन मुन चंद्रावर कशासाठी जात आहे. या सोबतच जगातील देशांमध्ये नेमकी स्पर्धा कशासाठी सुरू आहे. याबद्दलच आपण जाणून घेणार आहोत.

   

भारतीय चांद्रयान 3 हे रशियन यानाच्या तुलनेत छोटे असले तरीही ते मिशन पूर्ण करून दाखवेल अशी आशा आहे. रशियाचे हे 1976 नंतरचे म्हणजे 47 वर्षानंतर रशियाचे पहिले चंद्रयान मिशन आहे. भारताची आणि रशियाची ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर अवकाश संशोधनामध्ये दोन्ही देश हे एक पाऊल पुढे पोहोचतील. देशांमध्ये चंद्रयानाबाबत (Chandrayaan 3) मोठी उत्सुकता वाढत असताना जगातील बरेच देश चंद्रावर पोहोचण्यासाठी स्पर्धा करत आहे.

चंद्राच्या मोहिमा कशासाठी ? (Chandrayaan 3)

शास्त्रज्ञांनी सांगितलं की चंद्रावर हेलियमचे समस्थानिक आहेत. हे समस्थानिक पृथ्वीवर दुर्मिळ असून चंद्रावर दहा लाख टन असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्याचबरोबर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाणी सापडण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारतीय चांद्रयान मोहिमेचं आणि रशियाचं या मिशनचे मुख्य ध्येय हे चंद्रावर पाण्याचे साठे आणि खनिजे शोधणे हे आहे. जेणेकरून चंद्राचे साठे मानवाला वापरता येऊ शकतात. यासोबतच आणखीन काही नवीन संसाधनांचा शोध लागला तर मानवाला त्याचा फायदा होईल. चंद्रावर जर पाण्याचे साठे सापडले तर भविष्यामध्ये मानवी वसाहती देखील चंद्रावर तयार होऊ शकतात. बऱ्याच वर्षापासून चंद्रावर मानवी जीवन जगणे शक्य आहे की नाही याबद्दल संशोधन सुरू आहे. त्यानुसारच चंद्रावर पाणीसाठा आणि काही नवीन संसाधने सापडल्यास चंद्रावर वसाहती तयार होतील.

यापूर्वी चंद्रावर फक्त अमेरिका पोहोचू शकली आहे. यासोबतच भारत जपान आणि इस्रायल ने देखील चंद्राच्या पृष्ठभागावर (Chandrayaan 3) उतरण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचा प्रयत्न असफल ठरला. आता भारत आणि रशियाचे हे चंद्रयान मोहिमेचे शेवटचा टप्पा असून चांद्रयान यशस्वी झाल्यानंतर हे दोन्ही देश एक पाऊल पुढे जातील. यानंतर 2030 पर्यंत अमेरिका आणि चीन देखील चंद्रावर पोहोचणार असल्याचे सांगण्यात येत आहे.