Chandrayaan 3 : चंद्रयान मोहिमांसाठी श्रीहरीकोटा येथील सतीश धवन केंद्रच का निवडले जाते? वाचा त्यामागील ‘ही’ कारणे

टाइम्स मराठी । शुक्रवारी म्हणजेच १४ जुलै रोजी भारताच्या चंद्रयान-३ मोहिमेने (Chandrayaan 3) अवकाशात झेप घेतली आहे. चंद्रयान-३ ला व्हेईकल मार्क-३ ने श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन दुपारी ठिक २ वाजून ३५ मिनिटांनी यशस्वी प्रक्षेपित करण्यात आले आहे. आता हे चंद्रयान २३ ऑगस्ट रोजी चंद्रावर उतरण्याची शक्यता आहे. मात्र आपल्याला हे माहित आहे का, चंद्रयान मोहीमेसाठी सतीश धवल अंतराळ केंद्राचीच का निवड करण्यात येते? तसेच श्रीहरीकोटा हीच जागा का निवडण्यात आली आहे? चला यामागील कारणे जाणून घेऊयात.

   

यापूर्वी अनेक चंद्रयान मोहीमा (Chandrayaan 3) श्रीहरिकोटा येथील सतीश धवल केंद्रावरुन प्रक्षेपित करण्यात आल्या आहेत. सर्वात प्रथम ९ ऑक्टोंबर १९७१ रोजी रोहिणी-१२५ नावाचे छोटे यान अंतराळात सोडल्यानंतर हे केंद्र कार्यान्वित करण्यात आले. यापूर्वी या केंद्राला रेंज असे म्हटले जात होते. मात्र २००२ मध्ये इस्त्रोचे माजी अध्यक्ष सतीश धवल यांच्या सन्मानार्थ या केंद्राला सतीश धवल केंद्र हे नाव देण्यात आले.

सतीश धवल केंद्र निवडण्याची मुख्य कारणे- (Chandrayaan 3)

मुख्य म्हणजे, अंतराळ केंद्राची उभारणी करण्यासाठी श्रीहरीकोटा येथील सतीश धवल केंद्र निवडण्याची दोन मुख्य कारणे शास्त्रज्ञांनी सांगितली आहेत. त्यातील पहिले कारण म्हणजे, श्रीहरीकोटा हे भारताच्या पूर्वेकडे आहे. भारताच्या या भागातून यानाचे प्रक्षेपण करणे अधिक सुलभ आणि सोपे आहे. यानंतर दुसरे मोठे असे कारण की, श्रीहरीकोटापासून विषुवृत्त जवळ आहे. कोणतेही यान येथून सोडल्यामुळे पृथ्वीला प्रदक्षिणा घालण्याचा मोठा फायदा होतो.

कोणत्याही यानाच्या प्रक्षेपणाचे ठिकाण जेवढे विषुवृत्ताच्या जवळ, तेवढे उड्डाण सोपे होते. श्रीहरीकोटा हे विषुवृत्ताच्या सर्वात जवळ असल्यामुळे याठिकाणाची निवड करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर यातील आणखीन एक कारण असे आहे की, श्रीहरीकोटा हे ठिकाण समुद्राच्या किनाऱ्यावर वसले आहे. यामुळे यानाचा (Chandrayaan 3) मार्ग देखील समुद्रावरुन जातो. आणि यान जाताना त्यामध्ये कोणतेही अडथळे निर्माण होत नाहीत.

यासर्व कारणांमुळेच श्रीहरीकोटा येथे सतीश धवल केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. सर्वात प्रथम याठिकाणी केंद्र उभारणीसाठी ४० हजार एकर जमीन खरेदी करण्यात आली होती. त्यानंतर हळूहळू केंद्राचा विस्तार वाटत गेला. आता हे केंद्र भारतातील मुख्य अंतराळ केंद्र बनले आहे. याच ठिकाणाहून अनेक मोहिमा यशस्वी राबवण्यात आल्या आहेत.