टाइम्स मराठी । भारताचे मिशन चंद्रयान 3 हे मिशन काही महिन्यांपूर्वी यशस्वीरित्या पार पडले होते. त्यानंतर या मिशनच्या माध्यमातून पाठवण्यात आलेले प्रज्ञान आणि विक्रम लँडर अजूनही चंद्रावर आहे. या प्रज्ञान आणि विक्रम लँडर ने चंद्रावर असलेल्या बऱ्याच गोष्टींचे फोटो पाठवलेत आणि चंद्राच्या पृष्ठभागाचे फोटो देखील शेअर केले होते. इस्रोचे हे मिशन यशस्वी झाल्यानंतर प्रज्ञान रोवर हे सप्टेंबर महिन्यात स्लिप मोड मध्ये गेले होते. चंद्रावर असलेल्या वातावरणामुळे दोन्ही लँडर हे स्लीप मोड मधून बाहेर येऊ शकले नाही. त्यातच आता चांद्रयान 3 च्या या प्रज्ञान लॅन्डर बद्दल आणखीन एक माहिती उघड झाली आहे.
चांद्रयान तीन मिशनच्या माध्यमातून चंद्रावर पाठवण्यात आलेले LVM3 M4 व्हिकलचा एक हिस्सा नियंत्रणाच्या बाहेर गेला आहे. या अनियंत्रित झालेल्या भागाने 15 नोव्हेंबरला दुपारी 2:42 मिनिटांनी पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला आहे. याबाबत भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रोने बुधवारी माहिती दिली. अनियंत्रित झालेला भाग हा लॉन्च झालेल्या व्हिकलच्या क्रायोजनिक अपर स्टेज चा भाग होता. हे व्हीकल 14 जुलैला ठरवलेल्या कक्षेमध्ये स्थापित करण्यात आले होते.
या ठिकाणी पडेल व्हिकलचा हिस्सा
मिळालेल्या माहितीनुसार, चांद्रयान तीन च्या लॉन्च झालेल्या व्हिकलचा भाग नियंत्रणाच्या बाहेर गेला असून पृथ्वीच्या वातावरणामध्ये या भागाने प्रवेश केला आहे. आता हा भाग भारतात कोणत्या ठिकाणी पडेल याचा अंदाज लावला जात आहे. त्यानुसार अंतिम ग्राउंड ट्रॅक भारतातून जात नसल्यामुळे उत्तर प्रशांत महासागरामध्ये हा भाग पडू शकतो. LVM3 M4 चा हा भाग कशामुळे अनियंत्रित झाला याबाबत इस्रोने कोणतीच माहिती दिलेली नाही.
काय म्हणाले इस्त्रो
याबाबत इस्रोने सांगितलं की, चांद्रयान 3 लॉन्च केल्यानंतर 124 दिवसांनी NORAD 57321 नावाच्या रॉकेटने पृथ्वीवर पुन्हा प्रवेश केला. चांद्रयान 3 च्या ऑर्बिट मध्ये हे स्थापित केल्यानंतर या व्हिकलच्या अपर स्टेज ला निष्क्रिय ( पेसिवेशन ) करण्याच्या प्रक्रियेमधून जावे लागले होते. रॉकेट मध्ये उपलब्ध असलेल्या प्रोपेलेंट आणि एनर्जी सोर्सला आता हटवण्यात आले आहे. जेणेकरून अंतराळामध्ये विस्फोट होण्याची भीती कमी होईल. ही प्रक्रिया इंटर एजन्सी स्पेस डेब्रिस कोऑर्डिनेशन एजन्सी IADC आणि युनायटेड नेशन च्या गाईडलाईन्सच्या माध्यमातून करण्यात येते.