Chandrayaan 3 Updates : उद्या नव्हे तर 27 ऑगस्टला होणार चंद्रयानाचे सॉफ्ट लँडिंग? ISRO ने दिली महत्वाची माहिती

टाइम्स मराठी | सध्या चांद्रयान 3 मोहीम चे लँडर चंद्राच्या कक्षेमध्ये चंद्राचा पृष्ठभागापासून 25 किलोमीटर अंतरावर चंद्राभोवती भ्रमण करत आहे. चांद्रयानाच्या सॉफ्ट लँडिंग कडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. या सॉफ्ट लँडिंगला आता एक दिवस उरले असताना काल इस्रो ने चांद्रयान 3 लँड होण्याची वेळ बदलण्यात आली होती. यासोबतच आता इस्रो च्या शास्त्रज्ञांनी विक्रम लँडर चंद्राचा पृष्ठभागावर लँड होण्याची तारीख देखील बदलली आहे.

   

स्थिती अनुकूल असल्यास 23 ऑगस्टला चंद्रावर उतरवण्यात येईल लँडर

याबाबत स्पेस एप्लीकेशन सेंटर इस्रो चे डायरेक्टर निलेश एम देसाई यांनी सांगितलं की, 23 ऑगस्टला स्थिती अनुकूल राहिली तरच चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंग करता येऊ शकते. 23 ऑगस्टला चंद्रयान 3 चंद्रावर उतरण्याच्या दोन तासांपूर्वी आम्ही लँडर मॉडेलची स्थिती आणि चंद्रावरील अनुकूल स्थिती यांचा अभ्यास करून लँडिंगचा विचार करू. असं देखील त्यांनी सांगितलं.

…. तर 27 ऑगस्टला लेंडर चंद्रावर उतरू शकते

23 ऑगस्टला चंद्रापासून 30 किलोमीटर अंतरा वरून लँडिंग करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. त्यावेळी लेंडर ची स्पीड 1.68 किलोमीटर प्रति सेकंद एवढी असेल. हा वेग प्रचंड असून 2 तास अगोदर लॅन्डर मॉड्युलला कमान दिल्या जातील. सर्व तांत्रिक बाबी तपासूनच पुढील निर्णय घेतला जाईल. परंतु स्थिती अनुकूल नसल्यास 23 ऑगस्ट ऐवजी 27 ऑगस्टला लेंडर चंद्रावर उतरू शकते. 27 ऑगस्टला आम्ही तयारी केली आहे अस ISRO कडून सांगण्यात आले आहे.

निलेश देसाई म्हणाले की, 23 ऑगस्ट लाच चंद्रावर लँडिंग करण्याचा आमचा विचार असून याबाबत ठरवण्यात येईल. त्यानंतर 27 ऑगस्टला लँडिंग चा प्रयत्न करण्यात आल्यानंतर विक्रम लॅन्डरच्या लँडिंग ची जागा देखील बदलेल. ही जागा सध्याच्या जागेपासून 400 ते 450 किलोमीटर लांब असेल.