ChatGPT Android App भारतात लाँच; गुगल प्ले स्टोअरवरून असं करा Download

ChatGPT Android App । गेल्या दोन महिन्यांपूर्वीच ओपनएआय (OpenAI) चे चॅटजीपीटी iOS वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. आता या चॅटजीपीटीचे नवीन अपडेट वर्जन Android मोबाईल वर सुद्धा यूजर्स साठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. नुकतेच कंपनीने चॅटजीपीटीचे अधिकृत ॲप भारतात लॉन्च केले आहे. तुम्ही गुगल प्ले स्टोअर वर हे अँप डाउनलोड करू शकता. भारतात अँड्रॉइड मोबाईल वापरणारे यूजर्स जास्त असल्याने याचा मोठा फायदा होणार आहे.

   

OpenAI ने सुरुवातीला चॅटजीपीटी ॲप यूएस, भारत, बांग्लादेश आणि ब्राझीलमधील वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करून दिले आहे. याबाबत कंपनीने ट्विट करत म्हंटल कि, ChatGPT चे Android व्हर्जन (ChatGPT Android App) आता युनायटेड स्टेट्स, भारत, बांगलादेश आणि ब्राझीलमध्ये उपलब्ध आहे. या लिस्ट मध्ये नसलेले इतर देशांतील वापरकर्ते Google Play Store वरून अॅपची प्री-ऑर्डर करू शकतात. ओपनएआय पुढील आठवड्यापर्यंत या यादीत आणखी देशांचा समावेश करणार असेही कंपनीने म्हंटल आहे. इथून पुढे ChatGPT ॲप आपण सहज प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करून अँड्रॉइड फोनमध्ये वापरू शकतो. तसेच याच्या वेगवेगळ्या फिचर्सचा आपण लाभ घेऊ शकतो.

अँड्रॉइड फोनमध्ये ChatGPT कसे डाउनलोड करावे? ChatGPT Android App

  • सर्वात प्रथम अँड्रॉइड फोनवरून Google Play Store मध्ये जावा.
  • प्ले स्टोअरच्या सर्च ऑप्शनमध्ये ChatGPT असे सर्च करा.
  • पुढे ChatGPT अधिकृतपणे अँड्रॉइड फोनमध्ये इंस्टॉल करा.
  • ChatGPT ओपन केल्यानंतर त्यात ऍपल आयडीसह लॉगिन करण्याचा पर्याय दिला असेल.
  • त्याच पर्यायावर क्लिक करून ChatGPT ॲपमध्ये आपले स्वतंत्र खाते तयार करा.
  • ChatGPT ॲप आपण Gmail आणि Email आयडीद्वारे देखील साइन अप आणि लॉग इन करू शकतो.

ChatGPT ॲपचा फायदा काय?

ChatGPT हे ॲप अँड्रॉइड फोनमध्ये इंस्टॉल केल्यानंतर (ChatGPT Android App) आपल्याला चॅटजीपीटी वापरण्यासाठी ब्राउझरवर पुन्हा जावे लागणार नाही. या ॲपच्या मदतीने आपली सर्च हिस्ट्री सेव केली जाते. या ॲपचा फायदा असा आहे की, आपण आपल्या फोनमधला कोणताही जुना सर्च पाहू शकतो. तसेच वापरकर्ते ॲपमध्ये देण्यात आलेले इतर फीचर्स इंस्टॉल करून वापरू शकतात. खास म्हणजे, हे ॲप विनामूल्य असल्यामुळे सर्वच अँड्रॉइड फोन वापर करते याचा फायदा घेऊ शकतात. परंतु यामध्ये इतर खास फीचर्सचा फायदा करण्यासाठी आपल्याला सबस्क्रीप्शन घेणे आवश्यक असणार आहे. परंतु हे बंधनकारक नसेल. इतर फीचर्स वापरकर्त्यांना सहज वापरता येतील.