ChatGPT ने निवडली ऑल टाइम Asia Cup XI; सचिन- जयसूर्यासह ‘या’ दिग्गजांचा समावेश

टाइम्स मराठी । एशिया कप 2023 (Asia Cup 2023) टूर्नामेंट लवकरच होणार आहे. सर्व ठिकाणी एशिया कप पाहण्यासाठी क्रिकेट प्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत आहे. त्यानुसार आर्टिफिशियल इंटेलिजंट वर काम करत असलेल्या ChatGPT ला ऑल टाइम एशिया कप ची टीम निवडण्यासाठी सांगितले असता ChatGPT ने जबरदस्त संघाची निवड केली आहे. विशेष म्हणजे यामध्ये ४ भारतीय खेळाडूंचा देखील समावेश आहे. आज काल आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा प्रत्येक ठिकाणी वापर होत आहे. त्यानुसार चॅट जीपीटीच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळवू शकतो. त्यानुसारच क्रिकेट टीम देखील या चॅट जीपीटीने निवडून दिली आहे.

   

ऑल टाइम एशिया कपसाठी ChatGPT ने निवडून दिलेल्या या लिस्टमध्ये सचिन तेंडुलकर, सनथ जयसूर्या, कुमार सांगाकारा, विराट कोहली, महिला जयवर्धने, विकेट कीपर आणि कॅप्टन म्हणून महेंद्रसिंह धोनी, शाहिद आफ्रिदी, वसीम अक्रम, आकिब जावेद, जसप्रीत बुमराह, आणि मुथय्या मुरलीधरन यांची निवड केली आहे.

ChatGPT ने निवडलेल्या या 11 प्लेयर्स पैकी एकेकाळचे दिग्गज खेळाडू म्हणजेच सचिन तेंडुलकर आणि सनद जयसूर्या यांना चॅट जीपीटीने सलामीची जबाबदारी दिली. सचिन तेंडुलकरने एशिया कप मध्ये खेळल्या गेलेल्या 23 सामन्यांमध्ये 971 रन बनवले आहेत. त्याचबरोबर सनथ जयसूर्याने 25 सामन्यांमध्ये 1220 धावा कुटल्या आहेत. चॅट जीपीटीने तिसऱ्या क्रमांकासाठी श्रीलंकेचा डावखुला विकेटकिपर फलंदाज कुमार सांगाकाराची निवड केलेली असून त्याने एशिया कप मध्ये 24 सामन्यात 1075 धावा बनवल्या आहेत. त्याचबरोबर चौथ्या नंबरला विराट कोहलीची निवड केली आणि पाचव्या नंबरला महेला जयवर्धनेची निवड केली. एवढेच नाही तर कर्णधार म्हणून चॅट जीपीटीने भारताचा यशस्वी कर्णधार राहिलेल्या एम एस धोनी ला निवडले आहे.

ChatGPT ने नंबर 5 साठी पाकिस्तानचा धडाकेबाज अष्टपैलू शाहिद आफ्रिदी आणि गोलंदाजीसाठी वसीम अक्रम, आकिब जावेद, तसेच भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह यांना निवडले. आणि फिरकीची जबाबदारी श्रीलंकेच्या मुथिया मुरलीधरनला निवडले. दरम्यान, चॅट जीपीटीने निवडलेल्या ध्यमातून ऑल टाईम एशिया कपच्या टीममध्ये आत्ता फक्त विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह हे ऍक्टिव्ह प्लेयर्स आहे. बाकी सर्व खेळाडू इंटरनॅशनल क्रिकेट पासून निवृत्त झाले आहेत.