Cheapest Electric Car : ‘या’ आहेत स्वस्तात मस्त 3 Electric Cars; खरेदी करणं ठरेल फायदेशीर

Cheapest Electric Car : पेट्रोल डिझेलचे वाढते भाव पाहता इलेक्ट्रिक वाहनांची मोठी चलती आहे. अनेक वाहन निर्माता कंपन्या आपल्या गाड्या इलेक्ट्रिक व्हेरिएन्टमध्ये बाजारात आणत असून ग्राहकांची सुद्धा या गाडयांना चांगली पसंती मिळत आहे. भारतीय ऑटोमोबाईल मार्केट मध्ये इलेक्ट्रिक वाहन बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये मोठी चढाओढ सुद्धा पाहायला मिळत आहे. आकर्षक लूक आणि पेट्रोल डिझेलची कटकट नसल्याने अनेकांना इलेक्ट्रिक गाड्याची भुरळ आहे. तुम्ही सुद्धा नवीन इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला स्वस्तात मस्त अशा ३ गाड्यांबद्दल तुम्हाला सांगणार आहोत. चला तर सविस्तर जाणून घेऊयात.

   

1) Tata Tiago EV

2022 मध्ये टाटा मोटर्स ने भारतीय बाजारपेठेमध्ये  Tata Tiago EV  इलेक्ट्रिक व्हर्जन (Cheapest Electric Car) मध्ये लॉन्च केली होती. ही इलेक्ट्रिक व्हर्जन कार चार व्हेरिएंट मध्ये उपलब्ध असून यामध्ये बरेच फीचर्स देण्यात आले आहेत. या टाटा  टियागो मध्ये दोन बॅटरी उपलब्ध आहेत. त्यापैकी एक 19.2 KWH बॅटरी असून ही बॅटरी 250 km पर्यंत रेंज देते. यासोबतच दुसरी बॅटरी 24KWH क्षमतेत उपलब्ध असून ही बॅटरी 315  किलोमीटरपर्यंत रेंज प्रदान करते. त्याचबरोबर ही  इलेक्ट्रिक कार 5.7 सेकंदात 0 ते 60 किलोमीटर प्रति घंटा एवढे मायलेज देते. या Tata Tiago EV ची किंमत 8.6 लाख रुपये एवढी आहे.

2) Tata Tigor EV– Cheapest Electric Car

Tata Tigor EV ही इलेक्ट्रिक कार (Cheapest Electric Car) असून यामध्ये 7 इंच टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम  देण्यात आली आहे. यासोबतच चार स्पीकर, क्रूज कंट्रोल, ऑटो कार कनेक्ट टेक्नॉलॉजी यासारखे फीचर्स देखील या इलेक्ट्रिक कार मध्ये उपलब्ध आहे. या इलेक्ट्रिक का ची किंमत 12.49 लाख रुपये आहे. Tata Tigor EV या इलेक्ट्रिक कार मध्ये 26 KWH बॅटरी देण्यात आली असून ही बॅटरी 75 PS पावर आणि 170 NM पीक टॉर्क जनरेट करते. ही बॅटरी सिंगल चार्ज मध्ये  315 किलोमीटर एवढी रेंज देते.

3) Tata Nexon EV

टाटा मोटर्स कंपनीने Tata Nexon EV नवीन अपडेट सह लॉन्च केली आहे. ही कार ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आणि फीचर्स परिपूर्ण  आहे.  या कारमध्ये सिल्वर फॉक्स स्किड प्लेट देण्यात आलेली असून पेट्रोल मॉडेल वर एलईडी टेल लॅम्प देखील देण्यात आले आहे. त्याचबरोबर नवीन हेड लॅम्प हाऊसिंग, नवीन युनिक स्लाईटेड डिझाईन, फ्रंटला एलईडी लाइटिंग कर्व्हमध्ये देण्यात आली आहे. हे एलईडी लाईट चार्जिंग स्टेटस देखील दाखवतात. टाटा मोटर्सच्या ह्या Tata Nexon EV ची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 14 लाख 74 हजार ते 19 लाख  94 हजार रुपये एवढी आहे.Tata Nexon EV या कारमध्ये सेकंड जनरेशन मोटर देण्यात आली आहे. ही 16000rpm पर्यंत चालण्यास सक्षम आहे. त्याचबरोबर 142.6 bhp पावर आणि 2500 nm मॅक्झिमम पीक टॉर्क जनरेट करते.  ही इलेक्ट्रिक कार तब्बल 465 किलोमीटर पर्यंत रेंज देते. तसेच तिचे टॉप स्पीड 150 किलोमीटर प्रति तास असून अवघ्या 8.9 सेकंदामध्ये ही कार 0 ते 100 किलोमीटर प्रति तास वेग वाढवण्यास सक्षम आहे.